देशाचे माजी गृहमंत्री तथा जलनायक डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने महारक्तदान शिबिराचे आयोजन

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
नायगाव येथे देशाचे माजी गृहमंत्री तथा जलनायक श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या १२३ व्या जयंती निमित्ताने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जयंती निमित्ताने मतदारसंघातील नायगाव, धर्माबाद, उमरी, तालुक्यातील प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांनी जयंती साजरी करण्याचे आवाहन नायगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी केले आहे.
नायगाव येथे देशाचे माझे गृहमंत्री तथा जालनायक श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंती निमित्ताने दिनांक 14 जुलै रोजी शुक्रवारी 11,00 वाजता माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय नायगाव बाजार महारक्तदान शिबिराचे उद्घाटन नायगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतरावजी चव्हाण यांच्या सहप्रमुख मान्यवरांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असून या महारक्तशिबिरात नायगाव मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा तसेच नायगाव मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सरपंच व प्रतिनिधींनी यांनी देशाचे माजी गृहमंत्री तथा जलनायक श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती विविध कार्यक्रमाने साजरे करावे असे आव्हान नायगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी केले आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या