नायगावात शरदचंद्र महाविद्यालया कडून मशाल रॅलीचे भव्य स्वागत.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या मशाल रॅलीचे भव्य स्वागत दि.24 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू, महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमूख डॉ.एन.पी. सानप व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, महाविद्यालयाचे अधिक्षक प्रशांत बिलवणीकर व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

या रॅलीची जबाबदारी प्रा.डॉ. बालाजी कतूरवार, डॉ.मनूरकर व डॉ. पाटील यांच्यावर होती. सदर मशाल रॅली विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या 34 महाविद्यालयाना भेटी देवून स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या महात्म्यांचा इतिहास वृद्धींगत करीत आहे.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये रॅलीच्या मान्यवरांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आल्यानंतर भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वचनाचे सामुहिक वाचन करुन प्रा.डॉ. गो.रा.परडे यांच्या वतीने शपथ देण्यात आले.
यावेळी प्रा.डॉ. बालाजी कत्तूरवार यांनी प्रास्ताविक करून तरुणांना मशाल रॅलीचे महत्व स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी रॅलीच्या संबंधाने मार्गदर्शन केले.प्रा.डॉ. नामदेव सानप यांनी सुत्रसंचलन केले यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व प्राध्यापक, अधिक्षक व प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी शंकर पवार होटाळकर, विद्यार्थिनी अक्षरा साहेबराव कांबळे, आशिया डुमणे, भाग्यश्री‌ पांचाळ, शितल ताटे, शतका जाधव, सविता कावळगाव, महानंदा मेत्रे, खुशी ऊप्पे ईत्यादी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या