शेवडी सेवा सहकारी सोसायटीवर प्रा.मनोहर धोंडे गटाचे वर्चस्व ; १३ पैकी १३ जागा बिनविरोध केवळ औपचारिकता बाकी !

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शेवडी (बा.) सेवा सहकारी सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली असून येथील सेवा सहकारी सोसायटीवर शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन नेते प्रा.मनोहर धोंडे यांच्या गटाने वर्चस्व मिळवित १३ पैकी १३ जागेवर त्यांच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शेवडी (बा.) सेवा सहकारी सोसायटीच्या सन २०२२ ते २०२७ सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची आज शेवटची तारीख २४ फेब्रुवारी होती. प्रा.मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.सरपंच कैलास धोंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या १३ जणांनी उमेदवारी दाखल केली होती.
विरोधकांना उमेदवारच मिळाले नसल्यामुळे सर्वच्या सर्व १३ उमेदवारांची निवड बिनविरोध झाली. असून केवळ औपचारिकता बाकी आहे. बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे- ( १) गणपती भाऊराव चपटे (२) केशव जळबाजी टेळके (३) कमलाकर विनायक पांडे, (४) शेख इसाक शेख नवाज (५) गुणवंत माणिका येजगे, (६) सौ.भागिरथाबाई राजाराम धोंडे, (७) श्रीमती ललीताबाई गणपती शिकारे, (८) गंगाधर तुकाराम चिकाळे, (९) बालाजी सटवाजी बहणे, (१०) धोंडीबा काटवटे, (११) महादू शिवराम नरंगले, (१२) बालाजी दासू राठोड (१३) निवृती मरीबा भागबोटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शेवडी (बा.) येथील या नवनिर्वाचित सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्यांचा सत्कार लोहा येथे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या लोहा येथील जनसंपर्क कार्यालयात शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनुमंत लांडगे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवा व्यापारी आघाडीचे लोहा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मानसपूरे,मा. सरपंच कैलास धोंडे, सरपंच बसवेश्वर धोंडे सह आदींची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या