संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी प्रा.ज्ञानेश्वर शिंदे यांची निवड !

( विशेष प्रतिनिधी- रियाज पठाण )

संभाजी ब्रिगेड च्या लोहा तालुकाध्यक्ष पदी प्रा. ज्ञानेश्वर शिंदे हरबळकर यांची निवड करण्यात आली आहे.

मराठा सेवा संघाच्या वैचारिक तालमीत तयार झालेला संभाजी ब्रिगेड चा छावा म्हणून कार्य करणारा युवा कार्यकर्ता प्रा. “ज्ञानेश्वर शिंदे हरबळकर” यांचे संघटनेतील योगदान लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी लोहा तालुका स्तरीय सोनखेड येथे पार पडलेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली.

त्यांच्या निवडीबद्दल विवीध स्तरातून वेगवेगळ्या माध्यमातून स्वागत होत आहे .

पदभार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना लोहा तालुका आणि परीसरात संभाजी ब्रिगेड ची बांधणी करण्याचे वचन देऊन प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतः तालुकाध्यक्ष समजून कार्य करावे .असे आवाहन करून शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

ताज्या बातम्या