शिंगणापूर येथील खरेदी विक्री संघावर बाबुराव पाटील हिवराळे यांची बिनविरोध निवड !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सूर्यवंशी ]
(कारेगाव फाटा) – संचालक मंडळाच्या बैठकीत खरीदी विक्री संघावर प्रतिनिधी म्हणून बाबुराव पाटील हिवराळे यांची निवड करण्यात आली. या बैठकीत चेअरमन वगळता अकरा संचालक हजर होते.
सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संचालक साहेबराव पाटील, दतराम पाटील, प्रकाश पाटील, शिंदे सुनिता, शिवाजी लाब्दे, अनुसयाबाई माधवराव पाटील, पिराजी पाटील कौटकर, चांदु गोणारे, गंगाधर लांडगे, बालाजी लांडगे आदि अकरा सदस्य हजर होते.
चेरमन दिगंबर पाटील हे गैर हजर होते हे विशेष. बिनविरोध निवड करण्यासाठी दत्ताहरी पाटील हिवराळे,  बळवंत माधवराव पाटील लाब्दे, राजु रोडेकर, दतराम गोनारे, पिराजी जाधव, शेषराव पाटील, माधवराव पाटील सरपंच आदींनी परिश्रम घेतले घेतले. 

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज*

            www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या