शिर्डी येथे कीर्तनाच्या वेळेस भाविकांना कीर्तनाच्या ठिकाणी सोडण्याचे परवानगी देण्याची मागणी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शिर्डी संस्थांच्या वतीने रामनवमीच्या दरम्यान कीर्तनाच्या वेळी कीर्तनाच्या ठिकाणी भाविकासाठी येण्यासाठी परवानगी देण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या मालिक एक है साईबाबाच्या श्री साईबाबा शिर्डी संस्थान च्या वतीने दरवर्षीप्रमाणे रामनवमी उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो परंतु गेल्या 2022 मध्ये रामनवमीच्या काळात कीर्तनासाठी भाविकांना सोडण्यात सुरक्षा रक्षक व पोलिसांनी अडवणूक केले होते डांगेतून सांगण्यात आले होते.

त्यावेळी कीर्तनासाठी सोडण्यात आले नाही त्यामुळे भाविक भक्त नाराज झाले होते परंतु यावर्षीच्या सन 20 23मध्ये रामनवमीच्या वेळेस कीर्तनाच्या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांना लेंडी बागेतून मार्गाने सोडण्याची कृपा करावी जेणेकरून कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता येतो व आनंद मिळतो शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नायगाव येथे साई भक्ताने निवेदनाद्वारे मागणी केली आहे या निवेदनावर साईभक्त ज्ञानेश्वर कवटीकवार, विजय पाटील चव्हाण, मारोती कत्तूरवार, साईनाथ मेडेवार, गजानन चौधरी , आशिष मामीडवार , शंकर वडजे आदी साई भक्तांनी सह्या केले आहेत.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या