बिलोलीत श्री.शिव हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती निमित्ताने महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.

( बिलोली ता.प्र. – सुनिल जेठे)
बिलोली देशमुखनगर/इंदिरानगर येथील श्री.शिव हनुमान मंदिरच्या वतीने दि.६ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केले असता हनुमान भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 श्री.शिव हनुमान मंदिराच्या समितीकडून या ठिकाणी अनेक उपक्रम राबवताना दिसून येत आहे. या शिव हनुमान मंदिराच्या कमिटी मध्ये अनेक क्षेत्रातील कर्मचारी व व्यापारी एकत्र येऊन श्री.हनुमान जयंतीसह इतर कार्यक्रम सहभाग घेऊन पार पाडत आहेत.
 श्री हनुमान मंदिरात आरती व अभिषेक 365 दिवस करण्याचा मानस व योग या ठिकाणी लाभलेला आहे. म्हणून भाविक भक्त या शिव हनुमान मंदिरात येऊन पुजा आर्चना करत आहेत.
सदरील शिव हनुमान मंदिर हे दोन कळसाचे मंदिर आहे. ह्या मंदिरात महादेवाचे अर्थात राज राजेश्वर यांचे पिंड व श्री हनुमान यांची मूर्ती आहे. येथे श्री शिव हनुमान मंदिरावर भक्तांची मोठी श्रद्धा आहे.
श्री. शिव हनुमान मंदिराचा महाप्रसाद घेण्यासाठी भाविक आपले सर्व काम सोडून श्री शिव हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन मोठ्या उत्साहाने महाप्रसाद घेण्यासाठी उपस्थित राहतात. या मंदिराच्या समितीचे पदाधिकारी न चुकता दररोज आपला अमूल्य वेळ मंदिरासाठी देताना दिसून येतात.
या मदिराच्या समिती मधील पदाधिकारी सदस्य असलेले श्री.डाॕ.भिमराव अंकुशकर, प्रा.गोपाळ घौधरी, युवा कार्यकर्ते इंद्रजीत तूडमे, सागर कलमुर्गे, संतोष दुडले, शंकरराव कलमुर्गे, शंकर लघूळकर, शिवाजी गायकवाड यांच्यासह भक्तगण, नागरीक व युवकांनी महाप्रसादाचा कार्यक्रम असो की ईतर कार्यक्रमात परिश्रम घेत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या