बिलोली देशमुख नगर, इंदिरानगर शिव हनुमान मंदीर येथे अमावस्या निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.

[ बिलोली ता. प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
बिलोली देशमुख नगर, इंदिरानगर शिव हनुमान मंदीर येथे अमावस्या निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. बिलोलीत हे शिव हनुमान मंदीर ब-याच वर्षापुर्वी स्थापन केले गेले. या मंदिरावर अनेक नागरिकांची व महिला भगीनींची भक्ती व श्रद्धा असल्याने ह्या शिव हनुमान मंदीराचे भव्य मंदीर बांधकाम करुन मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

सदर देशमुख नगर, इंदिरानगर येथील शिव हनुमान मंदीरासाठी नगरवासीयांनी परिश्रम, वेळ, पैसा देऊन एका झाडाखाली असलेले मंदीराचे भव्य बांधकाम करुन आकर्षक मंदिर उभारणी केली. येथे दर अमावस्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
या मंदिरासाठी प्ररिश्रम घेतलेले श्री .डाॕ.भिमराव अंकुशकर, प्रा.बाळगोपाळ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित तुडमे, दुडले, कलमुर्गे, शिवा गायकवाड यांच्यासह येथील नागरिक शिव हनुमान भक्त आहेत. यावेळी शिव हनुमान मंदिराच्या ठिकाणी भाविक भक्त व मंदिराचे स्वयंसेवक यांसह पदाधिकारी यांची मोठी गर्दी पहायास मिळाली. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या