नायगाव येथे साईबाबा मंदिरात शिव महापुराण कथा !

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या पानसरे नगरातील श्री साईबाबा मंदिरात परमपूज्य निरंजन भाईजी महाराज यांच्या शिवमहापुराण कथेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे .

नायगाव येथील शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या पानसरे नगरातील श्री साईबाबा मंदिरात शिव महापुराण कथा आयोजित केले असून कथा प्रवक्ता परमपूज्य निरंजन भाईजी महाराज यांच्या संगीतमय सुश्राव्यवानीतून दिनांक 20 मार्च 2025 गुरुवार रोजी सुरुवात होत असून दिनांक 26 मार्च 2025 वार बुधवार रोजी समाप्त होणार आहे सदरील कथा संध्याकाळी आठ ते 11 चालणार आहे.
तरी जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी या शिव महापुराण कथेचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त ग्रामस्थ मंडळी नायगाव बाजार च्या वतीने करण्यात आली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या