राष्ट्रसंतांच्या समाधी मंदीर बांधकाम भूमीपूजन सोहळ्याचा हा अविस्मरणीय क्षण भविष्यासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरेल”, – मा.प्रा.मनोहरराव धोंडे सर / संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटन
( विशेष प्रतिनिधी – गोविंद बिरकुरे )
भक्तीस्थळ राजूर(अहमदपूर) येथील परमवंदनीय वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर बांधकामाचे भुमीपुजन व द्वितीय पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला. हा भुमीपुजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या ऑंनलाईन उपस्थितीत व डॉ.भागवतजी कराड साहेब,व प्रा मनोहरराव धोंडे सर यांच्या हस्ते झाले.
या क्षणी मार्गदर्शन करताना *प्रा.धोंडे सर* म्हणाले *हा भुमीपुजन सोहळा येत्या भविष्यातील पिढीसाठी ऐतिहासिक क्षण ठरेल असे म्हणत या भक्तीस्थळावर राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधी मंदीराचे बांधकाम भुमीपुजन हे मा.नितीनजी गडकरी साहेब व कराड साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला हा अविस्मरणीय क्षण सर्वांच्याच सदैव आठवणीत राहील, या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत हे आपले भाग्यच.असे गौरवोद्गार सरांनी काढले.*
या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त भाविक भक्तांचा हजारोंचा जनसमुदाय जमला होता या जनसमुदायास मार्गदर्शन करताना मा.प्रा.धोंडे सरांनी पुढे सांगितले कि राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी आपल जीवन हे केवळ आणि केवळ निस्वार्थीपणे जनकल्यासाठी खर्ची घातल देशहितार्थ जीवन व्यतीथ केले*. अश्या या महान संतांचे विचार तेवत ठेवायचे झाले तर *ईथे मी मोठा तु मोठा आप्पानंतर मीच सर्वस असा दुष्टहेतू मनात बाळगणाय्रा लुंग्या सुंग्यापासुन सावध राहुन व ईथे विरोध करत अडथळे निर्माण करणाय्रा लोकांना आपण समाज म्हणून गव्हातील खडा बाजूला केल्यासारखे बाजूला काढून केवळ वंदनीय आप्पांचे उत्तराधिकारी राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज व त्यांचे अज्ञानपालक गुरुराज स्वामी यांच्या मार्गदर्शनाखालीच या भक्तीस्थळाचा विकास घडवत या स्थळाला दैदिप्यमान स्थानी नेण्याचा मानस* बाळगला पाहिजे असे स्पष्टपणे खडसावून सांगितले.
आणि या येथील कार्याला विरोध करणाऱ्या जुन्या विश्वस्त मंडळी असतील कि अजून कुणी समाज कंटक समाजाला कलंक असणारे लोक असतील त्यांनी कितीही नाटक केली केसेस व कोर्ट कचेय्रा केल्या तरी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे सत्याचाच नेहमी विजय होतो. कारण राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी जगाला प्रेरणादायी कार्य केलं आणि म्हणून त्यांचे उत्तराधिकारी राजशेखर महाराज यांचाच विजय होईल यात शंका नाही व त्या समाजविघातकाचे दुष्ट मनसुबे शिवा संघटना कदापि यशश्वी होऊ देणार नाही भक्तीस्थळावर आम्हाला वैयक्तिक कुठलही सदस्यत्व नको पण या पवित्र स्थळाला कुणी बदनाम करण्याच काम करीत असेल तर शिवा संघटना ढाल बनुन पुढे येईल असेही दणदणीत सांगितले. आणि भक्तीस्थळाच्या सर्वांगीण विकास व्हावा याकरिता भरपुर विकास निधी आणण्यासाठी शिवा संघटना सदैव तत्पर असल्याचेही आ.सरांनी सांगितले.
शिवा संघटनेच्या माध्यमातून फेब्रुवारी 2022 ला दिल्ली येथे मा.नितीनजी गडकरी साहेब, मा खुब्बा साहेब, कराड साहेब यांची भेट घेऊन जी मागणी करण्यात आली होती कि भक्तीस्थळ ते कपिलधार या राज्य महामार्गाला संत मन्मथ शिवलिंग पालखी मार्ग असे नाव देण्याच्या मागणीला अनुसरून आज गडकरी साहेबांनी आपल्या भाषणात त्याचे नामकरण जाहीर केले. त्याबद्दल त्यांचेही आभार आदरणीय प्रा धोंडे सरांनी मानले.
व यापुढील काळात भक्तीस्थळाच्या विकासासाठी केंद्रातील मुख्य अर्थराज्यमंत्री आपण असल्याने भरगोस निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणीही यावेळी प्रा.धोंडे सर यांनी मा.भागवतजी कराड साहेब यांच्याकडे केले.व अतिशय सखोल मार्गदर्शन मा.प्रा.धोंडे सरांचे सर्वांना लाभले.
या प्रसंगी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड साहेब,खा.सुधाकर श्रंगारे साहेब, मा.आ.विनायक पाटील, आ.रत्नाकर गुट्टे,आ.रमेश आप्पा आप्पांचे उत्तराधिकारी राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज, गुरुराज स्वामी,मानुरकर महाराज, तमलुरकर आप्पा,विविध गुरुवर्य,मान्यवर,शिवा संघटनेचे राज्य, विभाग, जिल्हा,तालुका पदाधिकारी कार्यकर्ते, भक्तमंडळी महिला पुरुष लहानथोर सदभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy