बिलोलीत “शिवा संपर्क अभियान” अंतर्गत शाखा पुनर्रचना व “शिवा सृष्टी मुख्यालयाची सभासद नोंदणी संदर्भात शिवा संघटनेची बैठक संपन्न !

(बिलोली) – “शिवा” अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहरराव धोंडे सर यांच्या सुचनेनुसार संबंध राज्यभर शाखांची पुनररचना करण्याच्या उद्देशाने चालू असलेल्या “शिवा संपर्क अभियानाच्या” अनुषंगाने बिलोली तालुक्यातील शिवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव यांची जिल्हाध्यक्ष संभाजी पा बुड्डे सर व शि.क.म.जिल्हाध्यक्ष वीरभद्र बसापूरे सर, तालुका प्रमुख महेश पा हांडे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह बिलोली येथे बैठक संपन्न झाली.

           शिवा संघटनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त “शिवा संपर्क अभियान” अंतर्गत शाखा पुनररचना करण्यासंदर्भात नियोजन करुन शाखा पुनरगठीत करत तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन बैठका घेऊन लवकरात लवकर नुतन पदाधिकारी यांची निवड करण्याचे ठरले.व “शिवा स्रष्टी” या शिवा संघटनेच्या भव्य मुख्यालयाच्या सभासद नोंदणी संदर्भात ही सविस्तर माहिती देऊन सभासद व्हावे असे आवाहन ही करण्यात आले.व याविषयी प्रत्येक गावा-गावात, सर्वांशी चर्चा करुन जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणी साठी प्रयत्न करावे असे जिल्ह्याध्यक्ष संभाजी पा बुड्डे सर यांनी सांगितले.

    यावेळी अष्टप्रधानमंडळ सदस्य बाबु पा शिवशेट्टे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय होपळे सर, विद्यार्थी आघाडी ता.अध्यक्ष मनोहर वसमते, शि.क.म.तालुका प्रमुख गंजगुडे सर, शहरप्रमुख त्र्यंबक पा सावळीकर, शिवाजी पा चंदनकर, व्यंकट पा कूरे,सदाशिव पा बोडके, राजू पा बामणे, गजानन पा दुडले, सुरेश पा गोइनोड, सुरेश पा येसगीकर, शिवशंकर देशमुख चिंचाळकर, हणमंतराव पा डोणगाव, गोविंद बिरकुरे बामणीकर, शिवराज पा कुरे, शिवशंकर पा.डोणगाव व तालुक्यातील शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदि उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या