बिलोली शहरातील मुख्य रस्त्यावर क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करुन देऊन पुतळा उभारण्याची शिवा संघटनेची मागणी !
बिलोली– दि 29 जून 2021 बाराव्या शतकातील थोर क्रांतीकारी युगपुरुष,समतानायक,युगप्रवर्तक वीरशैव लिंगायत धर्म प्रचारक,प्रसारक,जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या बिलोली शहरातील मुख्य रस्त्यावर अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीच्या मागणीसाठी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहरराव धोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा संघटना बिलोलीच्या वतीने बिलोलीचे माननीय मुख्याधिकारी व माननीय नगराध्यक्ष साहेब उपनगराध्यक्ष श्री.मा.मारोतीराव पटाईत यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
बाराव्या शतकात जगतज्योती महात्मा बस्वेश्वरांनी सर्व जाती धर्माला एका छत्रछायेखाली आणुन जगातील पहिली लोकशाही संसद म्हणून शिवानुभव मंडपाची स्थापना करून स्प्रश्य, अस्पृश्यता नष्ट करून जाती धर्म,भेदाभेद, याला थारा न देता विविध जातिधर्मातील लोकांना शिवदिक्षा देऊन अनुभव मंडपाचे सदस्य करत संबंध जगाला ऐकतेचा संदेश दिला.
आणि अशा या महान युगप्रवर्तकांचा अश्वारूढ पुतळा बिलोली शहरातील मुख्य रस्त्यावर व्हावा हि भावना शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रा.मनोहरराव धोंडे सर व बिलोली तालुक्यातील बहुसंख्येने असलेल्या तमाम वीरशैव लिंगायतांची असुन गेल्या 25 वर्षांपासून बिलोली तालुक्यात शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या थाटामाटात होत असते.
म्हणून अनेक वर्षांपासून ची असलेली शिवा मावळ्यांची द्रढ भावना त्यामुळे आज शिवा संघटनेच्या वतीने आज एका निवेदनाद्वारे नगरपरीषदेला मागणी करण्यात आली असुन नगरपरीषदेचे माननीय उपाध्यक्ष श्री मारोतीराव पटाईत यांनीही “खुप चांगली व योग्य मागणी आपल्या शिवा संघटनेची असल्याने निवेदनात दिलेल्या जागेपैकी योग्य जागेची निवड करुन आपल्याला मागणीचा निश्चितच विचार करत या संदर्भात पालीकेत ठराव घेण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल” असे आश्वासित केले.
यावेळी *शिवा संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष संभाजी पा बुड्डे सर,शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष अशोक दगडे सर,तालुका अध्यक्ष महेश पा हांडे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विजय होपळे सर,अष्टप्रधानमंडळ सदस्य बाबु पा शिवशेट्टे,ता.उपाध्यक्ष शिवा पा शिवशेट्टे,बिलोली शहरप्रमुख त्र्यंबक पा सावळीकर, अनुप पा डोणगावकर,सदाशिव पा बोडके,शिवा सोशलमिडीया ता.प्रमुख महेशकुमार साखरे,व्यंकट पा कुरे, गजानन दुडले,राजू पा बामणे,सुरेश गोईनोड सगरोळीकर,शंकरराव पा हांडे,गोविंद बिरकुरे,शिवशंकर देशमुख चिंचाळकर,शैलेश पा लघुळकर, हणमंत पा डोणगावकर, शंकरराव पा हांडे आदि तालुक्यातील शिवा संघटनेचे पदाधिकारी व महात्मा बसवेश्वर प्रेमी,शिवा मावळे उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy