[ नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी – गणेश पाटील कंदुरके ]
प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही कार्तीक शुध्द पौर्णिमेला श्री क्षेत्र कपिलधार ता.जि. बीड येथील यात्रेनिमित्त शिवा संघटनेचा 26 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजीत केला आहे. तसेच प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र शासनाच्या वतीने 20 वी शासकीय महापूजा संपन्न होणार आहे.
दि 18 नोव्हेंबर 2021 रोज गुरुवारी दुपारी ठिक 3.30 वाजता 20 वी शासकीय महापुजा महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी मा.ना.धनंजय मुंडे, मा.ना.अशोकराव चव्हाण, माजी मंत्री मा.श्री जयदत्त क्षिरसागर व बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असुन त्यानंतर ठिक 4.00 वाजता प्रतिवर्षी प्रमाणे शिवा संघटनेचा 26 वा भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळावा संपन्न होणार आहे.
या मेळाव्याचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणुन शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे उपस्थित राहणार आहेत. या शिवाय या भव्य राज्यव्यापी मेळाव्यात गुरुउपदेश देण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळया मठांचे अनेक मठाधिपती (शिवाचार्य) आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनीधी व मान्यवर यांच्यासह शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती औरंगाबादचे शिवा संगटनेचे वरिष्ठ पदादिकारी विरभद्र होनशेटे (कंत्राटदार) यांनी केले आहे. या वेळी प्रामुख्याने मा.श्री उमाकांत शेटे पुणे (राष्ट्रीय सरचिटणीस), मा.आ.शिवशरण अण्णा बिराजदार पाटील सोलापूर (राष्ट्रीय उपाध्यक्ष), मा. श्री अभयराव कल्लावार नागपूर (राष्ट्रीय उपाध्यक्ष), मा. डॉ. श्री वाय बी सोनटक्के मुंबई (राष्ट्रीय उपाध्यक्ष), मा. श्री वैजनाथराव तोनसरे नांदेड (महाराष्ट्र उपाध्यक्ष), मा.श्री धन्यकुमार शिवणकर परभणी (प्रांत सरचिटणीस), मा. श्री शैलेश जक्कापुरे पुणे (महाराष्ट्र उपाध्यक्ष), मा.श्री.विठठलराव ताकबीडे नांदेड (प्रांत सरचिटणीस शिवा कर्मचारी महासंघ), मा. श्री अरुण लद्दे नाशिक (महाराष्ट उपाध्यक्ष कर्मचारी महासंघ), मा.श्री.रुपेश होनराव डोंबीवली (प्रांत सरचिटणीस), मा.श्री.नारायण कंकणवाडी पनवेल (राज्य मुख्य संघटक, शिवा संघटना), श्री भिमाप्पा खांदे मलकापुर (महाराष्ट्र उपाध्यक्ष),मा. श्री. संतोषअप्पा होनराव अहमदनगर (महाराष्ट्र उपाध्यक्ष), मा. प्रा. श्री किसनअप्पा इमडे वसमत (प्रांत चिटणीस), मा. श्री. बालाजी बंडे मुखेड (प्रांत सदस्य), मा. श्री संजय कोठाळ (मराठवाडा अध्यक्ष, शिवा कर्मचारी महासंघ), मा. श्री अर्जुनराव सैदाने वसमत (मराठवाडा अध्यक्ष शिवा संघटना) मा. प्रा. श्री देवानंद बोन्ते कारंजा लाड (पश्चिम विदर्भ विभाग अध्यक्ष), मा. श्री विलास मोदे बुलढाणा (पश्चिम विदर्भ अध्यक्ष शिवा कर्मचारी महासंघ),मा. श्री. उध्दव खराडे, नवी मुंबई (कोकण-नवी मुंबई विभाग अध्यक्ष),मा. श्री सतिश भिसे डोंबीवली (मुंबई-ठाणे विभाग अध्यक्ष), मा. श्री अनिल कोठुळे नाशिक (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष), मा. अॅड. प्रशांत शेटे बार्शी (पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस), मा. श्री शिवराज कमळापूरे उस्मानाबाद (मराठवाडा सरचिटणीस), मा. श्री दिलीपराव खाकरे जालना (मराठवाडा उपाध्यक्ष),मा. श्री. विरभद्र कावडे शिखरशिंगणापूर (पश्चिम महाराष्ट चिटणीस), मा. श्री. सुनिल शेरखाने उस्मानाबाद (मराठवाडा उपाध्यक्ष), श्री प्रमोद भुजबळ तेरखेडा (मराठवाडा चिटणीस), श्री उद्धव गाडेकर वर्धा (पुर्व विदर्भ उपाध्यक्ष) इत्यादीसह सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिवा संघटनेचा 26 वा राज्यव्यापी मेळावा व 20 वी शासकीय महापूजा असल्यामुळे शिवा संघटनेच्या वतीने अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने व जल्लोषात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. पालकमंत्री मा.ना.धनंजय मुंडे, मा.ना.अशोकराव चव्हाण व माजी मंत्री मा.श्री जयदत्त क्षिरसागर यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
दि 18 नोव्हेंबर 2021 रोज गुरुवारी दुपारी 3.30 वाजता होणारी 20 वी शासकीय महापूजा व 26 व्या भव्य मेळाव्यासाठी पालकमंवी मा.ना.धनंजय मुंडे, मा.ना.अशोकराव चव्हाण, मा.आ. महादेव जानकर, माजी मंत्री मा.श्री जयदत्त क्षिरसागर, जिल्हाधिकारी बीड यांच्यासह इतर मान्यवर लोकप्रतीनिधी व अनेक गुरुवर्य यांना आमंत्रीत केले आहे. या वर्षीच्या मेळाव्यासाठी अनेक मान्यवर येणार असल्यामुळे त्या दृष्टीने मेळाव्यातील नियोजनबध्द तयारी आपल्या भागातून व्हावी अशी अपेक्षा आहे. शिवा संघटनेच्या या 26 व्या राज्यव्यापी मेळाव्याचे उद्घाटक म्हणुन प्रा. मनोहर धोंडे (संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष) हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कपिलधारला येतांना शिवा संघटनेच्या सर्व शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करुन आप-आपल्या भागातील / तालुक्यातील सर्वांना एकत्र करुन आप-आपल्या वाहनावर शिवा संघटनेचे बॅनर, झेंडे आणि स्पीकर लावुन सर्व वाहने एकत्रीत जीप रॅलीतुन घेवुन येण्याचे नियोजन करावे. जीप रॅलीतून येणार्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवा संघटनेचा गणवेश, रुमाल, टोपी, भस्म,बिल्ले लावुन व हातात शिवा संघटनेचे झेंडे घेवुन वीरशैव-लिंगायत धर्माचा आणि शिवा संघटनेचा जयघोष करत हजारोंच्या संख्येने संघटीतपणे ढोल ताशांच्या गजरात दि 18 नोव्हेंबर 2021 रोज गुरुवारी दुपारी ठिक 2.00 वाजेपर्यंत वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, राज्य सरचिटणीस विठ्ठल ताकबीडे, मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हा संपर्क प्रमुख इंजि. अनिल माळगे, जिल्हाध्यक्ष सर्वश्री संभाजी पाटील बुढ्ढे, शंकर पत्रे, दिगंबर मांजरमकर, विरभद्र बसापुरे, सौ. सत्यभामा येजगे, सौ. नंदाताई पाटील, शुभम घोडके, नंदुअप्पा देवणे, सोशल मिडीया सर्वश्री बाबु पा. शिवशेट्टे, शंकर नलबले, अनिल मुंडकर, सचिन धोते, दत्तात्रय चैनपुरे, शिवराज उमाटे, विजय हिंगमिरे, सतीश मठपती, प्रसिद्धी प्रमुख गंगाधर मंगनाळे, रामकिशन पालीमकर, विजय होपळे आदींनी केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy