शिवा संघटनेच्या शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार बाबु शिवशेट्टे ममदापुरकर यांना जाहीर !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
वीरशैव लिंगायत समाजातील प्रबळ असणाऱ्या शिवा संघटनेच्या वतीने समाजातील मानाचा समजला जाणारा शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार दरवर्षी कार्तिक शुध्द पोर्णिमेला कपिलधार येथे शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा मध्ये दिला जातो,यंदाच्या शिवा संघटनेच्या 2021 च्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये शिवा सोशल मिडीया महाराष्ट्र अष्टप्रधानमंडळ सदस्य श्री लच्चप्पा ऊर्फ बाबु पाटील शिवशेट्टे ममदापूरकर यांना ऊत्क्रष्ट शिवा सोशलमिडीया कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार 18 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कपिलधार येथील राज्यव्यापी मेळाव्यात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे, गुरुवर्य शिवाचार्य महाराज,आदी मान्यवरांच्या उपस्थित देण्यात येणार आहे….
या निवडीबद्दल शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वैजनाथ अण्णा तोनसुरे, राज्य सरचिटणीस विठ्ठलराव ताकबीडे, मराठवाडा प्रमुख संजय कोठाळे, जिल्हासंपर्क प्रमूख ईंजि.अनिल माळगे, जिल्हाध्यक्ष संभाजीराव बुड्डे, प्रा.शुद्धोधन गायकवाड,महेश पा हांडे,शिवा शिवशेट्टे,संतोष पाटील चंदनकर, नागेश पा जवळे,संतोष साखरे,गजानन भाले,संभाजी पा शिवशेट्टे,शिवकुमार पटने,प्रा.हणमंत पटने,सदाशिव बोडके,नागनाथराव माली पाटील, सयाराम निदाने, राहुल शिवशेट्टे, राजेश गाडले आदिंनी अभिनंदन केले आहे
www.massmaharashtra.com

    (फोटोवर क्लिक करून युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा )

ताज्या बातम्या