नांदेड– जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी या गावातील शिवा संघटनेच्या शाखेेची पुनर्रचना करुन नव तरूणांना संधी देत नुतन कार्यकारिणी ची निवड करून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहरराव धोंडे सर यांच्या शुभहस्ते शाखेचे अनावरन मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आले.
“शिवा संपर्क अभियान” अंतर्गत शिवा संघटनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संबंध महाराष्ट्रासह अन्य राज्यभर शिवा संघटनेच्या 3000/ शाखांची पुनररचना करण्याचे प्रा.मनोहरराव धोंडे सर यांनी जाहीर केल्यानंतर प्रत्येक गावागावात शिवा संघटनेच्या शाखा पुनरगठीत करत युवा वर्गाला प्राधान्य देत एक नवचैतन्य निर्माण होताना दिसते आहे. याच धर्तीवर बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे शिवा संघटनेच्या फलकाच अनावरन अत्यंत जल्लोषात जय शिवा च्या गजरात मोठ्या उत्साहाने झाले.
यावेळी शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पा बुड्डे, वीरभद्र बसापूरे, बिलोली तालुका प्रमुख महेश पा हांडे, अष्टप्रधानमंडळ सदस्य बाबु पा शिवशेट्टे, अनिल पा मुंडकर, सदाशिव पा बोडके, विश्वनाथ पा संमन, शंकरप्पा महाराज उदगिरे, शिवकुमार पा बाबने, व्यंकटराव बामने, संजय पा.चीलनोड, शंकर पा महाजन, शिवराज पा बामणे, मारुती पा बामणे, बालाजी पा हुमनापुरे, सुभाष पा. कुरुटगे, डॉ कटके, महेश पा खिरप्पावार, वैजनाथ पा खिरप्पावार, नरसिंग पा खिरप्पावार, गंगाधर पा महाजन, सुरेश पा गोइनोड, राजू पा महाजन, नागु महाराज मठवाले, शिवकुमार पा महाजन, शिवराज पा मलनोड, दत्तू बामणे, नागराज मुदप्पावर, व्यंकट पा महाजन, कालिदास पा माळगे, देविदास मरखले, सुरेश पा माळगे, बालाजी पा बामणे, राजू पा बामणे, सुनिल पा खिरप्पावार, बसवराज पा मुंगळे, गजानन तीपाजी, दत्तू पा. तीपाजी आदी यांच्यासह शिवा संघटनेचे नूतन शाखाअध्यक्ष:- आदीनाथ बाबने, उपाध्यक्ष:- ओम कोरे, उपाध्यक्ष:- नागेश तिप्पाजी, मुख्यसंघटक:- निलेश महाजन, सचिव:- प्रदीप ऊलग्गडे, सहसचिव:- महेश उदगिरे, संघटक:- व्यंकट अल्लेबल्ले, सहसंघटक:- लालप्पा संमन, कोषाध्यक्ष:- सुरज गोईनोड, जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवा मावळे, समाजबांधव गावातील कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक युवा मंडळी यांची प्रामुख्याने उपस्थिती होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy