कुंडलवाडीत विविध ठिकाणी शिव जयंती साजरी !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
         येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिव उद्यान मराठा गल्ली व बसस्थानक येथील शिवाजी चौक येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली तर शहरातील नगर परिषद,पोलीस ठाणे,प्राथमिक आरोग्य केंद्र,विद्युत वितरण कार्यालय,मिलिंद प्राथमिक व विद्यालय,गंगाबाई सब्बनवार हायस्कूल,जिल्हा परिषद हायस्कूल,आदी ठिकाणी शिव जयंती साजरी करण्यात आली.
           यावेळी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी आर जी चौहान,साह्याक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, वैद्यकीय अधिकारी प्रद्यूमन पाटील, अभियंता सुरेश गटटूवार, माजी उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, राष्ट्रीय स्वयं सेवक तालुका संघचालक विश्वनाथ अण्णा दाचावार, युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत सब्बनवार, शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण गंगोणे, कल्याण गायकवाड, राम रत्नागिरे, संतोष चव्हाण, गंगाधर शिंदे, ओमकार सहाणे, नागनाथ कोलंबरे, शेखर वारेवार, दत्तू हमंद,प्रशांत पांडे,आदीसह मोठ्या प्रमाणात समाज बांधव व नागरिक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या