राज्यातील कोणत्याही स्वस्तधान्य दुकानामधुन रेशनकार्ड धारकांना धान्य घेण्याची तरतूद करा – सा.का.शिवानंद पांचाळ यांची अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांकडे मागणी!

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधुन कोणत्याही आणि कुठेही लाभधारक रेशनकार्ड धारकांना धान्य घेण्याची तरतूद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांनी अन्न पुरवठा मंत्र्याकडे मागणी केली आहे.

राज्यातील काही नागरिक आपला उदारनिर्वाह, करण्यासाठी गोरगरीब रेशनकार्ड लाभधारक आपले गाव जिल्हा सोडून किंवा ग्रामीण भागातून शहरी भागात मध्ये मोलमजुरी करण्यासाठी आलेले असतात, त्यामुळे त्यांना आपल्या नोंदणी स्वत धान्य दुकानापासुन धान्य राशन,उचलता येत नसल्यामुळे त्यांची व त्यांच्या परिवाराला उपासमारीचा सामना करावा लागत आहे.

रेशनकार्ड धारक म्हणजे एक कष्टकरी,गरीब कुटुंब असते, या वाढत्या महागाई त्रस्त झालेला वर्ग आहे. लाभधारक असुन देखील त्यांना स्वस्त धान्य पासून वंचित राहावे लागत आहे. याची शासनाने दखल घ्यावी लाभ धारकांनी धान्य प्रत्येक महिन्याला उचलले किंवा नाही उचले हे कळण्यासाठी मोबाईल नंबर लिंक करावे. त्यामुळे लाभ धारकांना कळेल की त्यांचे धान्य प्रत्येक महिन्याला पोहचले किंवा नाही उचलले.

फिंगरप्रिंट ऑनलाइन नोंदणी असल्यामुळे त्यांना स्वस्त धान्य पासून वंचित राहावे लागत आहे. लाभधारक जिथे असतील तिथे त्यांची फिंगरप्रिंट लावून त्यांना धान्य देण्याची तरतूद करण्यात यावी. असे केल्याने धान्य पासून वंचित असलेल्या लाभार्थी कुटुंबाना न्याय मिळेल.लाभार्थी कुटुंब धान्यापासून वंचित राहणार नाहीत.

गोरगरीब,कष्टकरी,मजुरदार,रेशनकार्ड धारक लाभार्थ्यावर अन्याय होत असल्याने शासनाने या मागणीचा विचार करून त्वरित दखल घेऊन लाभार्थींना दिलासा द्यावा, असे मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

ताज्या बातम्या