नायगांवचे भुमिपुञ शिवानंद पांचाळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

(नायगाव बाजार- दि, २८ फेब्रुवारी )
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा”. या संत तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे गोरगरिबांची सेवा, बेवारस मनोरुग्ण सेवा, अनाथ वयोवृद्धांची सेवा, सामाजिक बांधिलकी जोपासत जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून संत गाडगेबाबा महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन निस्वार्थ सेवेचे व्रत घेवून काम करणारे नांदेड जिल्ह्यातील नायगांव बाजार येथील युवा समाजसेवक शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांना भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २०२२ विषेश पुरस्कार सोहळा नाशिक येथील हॉटेल ग्रॅन्ड आश्विन येथे नाशिक विभागाच्या आमदार मा.सीमाताई हिरे, तसेच माणुसकी शोशल फाऊंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. दादाभाऊ केदारे, राज्यातील आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माणुसकी सेवा गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, ट्रॉफी, महावस्त्र , मानाचा फेटा असा होता, भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या दुसऱ्या वर्षात पदार्पणानिमित्ताने समाजाप्रती दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल राज्यभरातील विविध क्षेत्रातील बारा व्यक्तींना दि.२६ फेब्रुवारी २०२२ रोजी पुरस्कार देवून गौरविण्यात आले, हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला, सदर राज्यस्तरीय पुरस्काराने नायगांवचे भुमिपुञ सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ सन्मानित झाल्यामुळे शहरात व विविध क्षेत्रातून चांगलीच वाहवाह व कौतुक होताना दिसत आहे, त्यांच्यावर समाजातून अभिनंदनाचा शुभेच्छांचा वर्षावही केला जात आहे, यावेळी शिवानंद पांचाळ म्हणाले मी एक सामान्य माणूस आहे सामान्य माणूस म्हणून काम करत आहे, निराधार दिव्यांग वयोवृद्ध बेघर मनोरुग्ण गरीब गरजू मध्येच देव आहे, समजून मी सामान्य माणसाला आधार देण्यासाठी छोटासा प्रयत्न करत आहे.

माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची‌ दखल समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दादाभाऊ केदारे, व समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी माझ्या कार्याची दखल घेऊन समितीतर्फे मला पुरस्कृत केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, व आभार मानतो, पुरस्कारामुळे समाज कार्य करायला अजुन उर्जा येते, आणि तेवढीच जबाबदारी वाढते, शंभर टक्के समाजकारण. हा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय कर्मवीर मा.सा.दादासाहेब कन्नमवार यांचा वारसा घेवून काम करत आहे असे मत शिवानंद पांचाळ आमच्या वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या