शिवणी जामगा गावातील पीडित गणेश एडके चा सर्व वैद्यकीय खर्च प्रशासनाने करावा-आजाद समाज पार्टी

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवणी जामगा या गावी जातीयतेतून गावातील बौद्ध वस्तीवर हल्ला करण्याच्या मानसिकतेतून आलेल्या जातीवादी गुंडांना मानवतेच्या सामाजिक भावनेतून रोखण्यास गेलेल्या गणेश येडकेवर धारदार कुऱ्हाडीने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले गेले.
जातीय भावनेतून गणेश वर झालेल्या हल्ल्यामूळे गणेश रक्तबंबाळ होऊन जबर जखमी झाला. गणेशची परिस्थिती नाजूक आहे. औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात तो जीवन मरणाशी झुंज देतो आहे.
गणेश वर झालेल्या हल्ल्याने आंबेडकरी समुदायात संतापाची लाट पसरलेली आहे. शिवणी जामागा प्रकरण आणि गणेशची प्रकृती हा सध्या आंबेडकरी जनतेच्या केंद्रस्थानी आहे गणेशचा जीव वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गणेश येड्के यांची एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करत तत्काळ मुंबई येथील सर्वोत्तम दवाखान्यात रवानगी केली गेली पाहिजे आणि त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च प्रशासनाकडून झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. गणेशच्या उपचारासाठी ठोस पाऊले सरकारकडून उचलले गेले नसल्यास, राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे गणेशच्या जीवाचं काही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी राज्य सरकार व प्रशासनाची असंवेदनशीलता जबाबदार असेल याची दखल घ्यावी.
आंबेडकरी जनतेच्या उद्रेकाला राज्य सरकारला सामोरे जावे लागेल उदभवणार्या परिस्तिथीस सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल असा इशारा आजाद समाज पार्टीचे बिलोलीचे नेते इंद्रजीत डुमणे गागलेगावकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांना ई मेल द्वारे निवेदन पाठवुन दिलेला आहे.

                   ( इंद्रजित डुमणे गागलेगावकर – आजाद समाज पार्टी )

ताज्या बातम्या