सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीण रूग्णालय नायगांव येथे चि.शिवांश शिवानंद पांचाळ चा दुसरा वाढदिवस फळे – बिस्किटं वाटप करून साजरा..

नायगांव प्रतिनिधी :- 29 सप्टेंबर

सामाजिक कार्यकर्ता शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांनी बांधिलकी जोपासत यांचा मुलागा चि.शिवांश पांचाळ चा दुसरा वाढदिवस अत्यंत सरळ व साध्या पद्धतीने वायफळ पैसे खर्च न करता अनेकांना यातून काही तरी प्रेरणा मिळावी या प्रामाणिक भावनेतून यांनी शासकीय ग्रामिण रुग्णालय नायगांव बाजार येथे रूग्णांना बिस्किटं,फळे, वाटप करून साजरा केले.

या वेळी रूग्णालयातील कर्मचारी व मित्र गजानन फुलारी सचिन फुलारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, शिवानंद पांचाळ यांनी केल्या काही वर्षांपासून स्वतःचा देखील वाढदिवस याच पद्धतीने साजरा करत आहेत.

शिवानंद पांचाळ नेहमीच ते आपले कर्तव्य समजून आपणासही समाजाचे काही देणें लागते या भावनेतून समाजउपयोगी मदत कार्यात सहभाग नोंदवून कार्य करत असतात यांनी जे समाजभान जपत कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे,

ताज्या बातम्या