शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या – शिवसेनेची मागणी !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव तालुक्यातील समस्त शिवसैनिकांनी नायगाव येथील तहसील कार्यालयात निवेदन देऊन नांदेड – हिंगोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचा ३१ तारखेला संवाद दौरा होता, सदरील दौऱ्यामध्ये हिंगोली येथे कार्यक्रमात बंडखोर आमदारांच्या संदर्भात निषेध म्हणून शिवसैनिकांना सुचना थोरात यांनी दिल्या, परंतु त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला व हिंगोलीमध्ये बंडखोर आ. संतोष बांगर यांच्या दबावाखातर बबनराव थोरात यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केलयाचा ठपका ठेवत खोटा गुन्हा नोंद करण्यात आला व आज रोजी थोरात यांना मुंबई मध्ये अटक करण्यात आली.
सदरील प्रकरणी बबनराव थोरात यांच्यावरील गु.र.क्र. 404, 505 दाखल गुन्हा मागे घेवून निर्दोष मुक्तता करण्यात यावी. अन्यथा लवकरच संबंध जिल्हाभर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल अशी नायगाव तालुक्यातील समस्त शिवसैनिकांची आक्रमक भूमिका दिसून आली यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रविंद्र पाटील भिलवंडे, व उपस्थित रविंद्र शिवाजीराव मिलवंडे, ओमप्रकाश पाहील धुप्येकर बाळासाहेब सर्जे, गजानन तमलुरे, शिवाजी कुंटूरकर आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बबनराव थोरात यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या