शैलेश जनार्दन पाटील यांची शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी !

[ अलिबाग प्रतिनिधी-अभिप्राव पाटील ]
शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळून अनेक कार्यकर्ते शिवसेना तसेच इतर पक्षांत प्रवेश करत आहेत. या पक्षात फक्त घराणेशाही चालते असा आरोप करीत आणि पक्षात मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढत चालला आहे या जाचाला कंटाळून आज मुरुड तालुक्यातील मौजे वाळवटी – उसरोली येथील ग्रामपंचायत सदस्य शैलेश जनार्दन पाटील व कार्यकर्त्यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख व आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या