शिवसेना नेते ना.एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त १०० रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न!

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)

शिवसेना नेते मा.ना.एकनाथ शिंदे (नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त व मा.खा.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन च्या वतीने 100 रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

 

 

या सोहळ्यात देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी साठी 1 रुग्णवाहिका भेट म्हणून, मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देगलूर-बिलोली मतदार संघाचे उत्कृष्ट संसदपटू माजी आमदार सुभाष साबणे यांच्याकडे सुपर्द केली.

 

 

यावेळी महाराष्ट्राचे कृषि मंत्री मा.ना.श्री दादाजी भुसे, ठाण्याचे खासदार राजेंद्र विचारे,हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार किशोरअप्पा पाटील,आमदार बालाजी कल्याणकर, युवासेना जिल्हा युवा अध्यक्ष विक्रम साबणे,श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे प्रमुख मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताज्या बातम्या