कुंडलवाडी शहरात शिवसेनेची आढावा बैठक, तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी !

मोफत नेत्र तपासणी चा गरजू लोकांनी लाभ घ्यावा –                             उमेश मुंडे (शिवसेना जिल्हा प्रमुख नांदेड)

[ प्रतिनिधी – जयवर्धन भोसीकर ]
कुंडलवाडी शहरात आज शिवसेने चे शहराध्यक्ष शंकर कोनेरवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेने ची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांनी केले. शहरात 24 ते 30 तारखे पर्यंत वेग वेगळया गल्ली मध्ये नेत्र तपासणी शिबीर, मोफत औषधी वाटप असे उपक्रम राबवन्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांनी या बैठकीत दिली.
या वेळी उपजिल्हा प्रमुख मारोती वाडेकर, बिलोली तालुका प्रमुख विजय मुढंकर, युवा सेनेचे बालाजी शिंदे, लक्ष्मण गंगोने, शिवसेना शहराध्यक्ष शंकर कोनेरवार, मोहन पांडे, अनिल पेंटावार, गणेश ठक्कुरवार यांच्या सह असंख्य शिवसैनिक या बैठकीला हजर होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या