● येणाऱ्या जि.प.पं.सं. नगरपालीका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा- विशाल सावंत ..

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी- आनंद सुर्यवंशी ]
उमरी :- उमरीत तालुका शिवसेना आढावा बैठक पार पडली. त्या- बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना नायगाव विधानसभा- मतदार संघाचे प्रमुख विशाल सावंत यांनी येणाऱ्या जि. प. पं सं नगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले.

आढावा बैठकीत उपजिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, तालुका प्रमुख सुभाष पेरेवार, उपतालुकाप्रमुख शिवाजी पा. हस्सेकर, बाबुराव पा.भूते सरपंच तथा मा.सं गा. नियोजन समिती अध्यक्ष, गुलाब पा जाधव वाहतूक सेना, शिवाजी पा. पवार विभाग प्रमुख, बालाजी पवार युवासेना, दत्तात्रय पुयड, संघटक डॉ. गोविंद राठोड, संजय हाबर्डे विभाग प्रमुख, गोविंद पा. कळगावकर विभाग प्रमुख, ज्ञानेश्वर मामडे सोशल मिडीया उमरी, सुरेश पा. गाढे (उपसरपंच), दिगंबर ईगळे मा. सरपंच तळेगाव, मोहन पा. कदम, निळकंठ पा मनुरकर, पंडीत पा. ढगे मारोती पांडे, साहेबराव मोखडीकर, दत्ताहरी जाधव, साईनाथ चंदापूरे, अशोक गुंजकर, साहेबराव पा. कदम, कैलास पवार, बालाजी जाधव, सोपान गायकवाड, विठ्ठल लखमोड, बालाजी पा शिंदे, विलास कोल्हे, शिवराज पा हिवराळे, गणेश पा हंबर्डे, माधव सोळंके, गोपाल लोध, सोनु आहिरे, संतोष गंगासागरे, साईनाथ अरगुलवार, साईप्रसाद पेरेवार, सागरसिंगीं सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना विशाल सावंत म्हणाले उमरी हे पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. उमरी नगरपालिका एकमेव शिवसेनेची होती. सुभाष पेरेवार तुम्ही तालुक्यात शिव संपर्क अभियान व शिवसेना सदस्य नोंदणी योग्य पद्धतीने राबवून संघटन मजबूत केले. येणाऱ्या काळात सहकारी सह निवडणुकीत जि. प. व पं सं नगरपालिका निवडणुकीत निश्चित यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमात गंगाधर बडूरे, सुभाष पेरेवार यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन शिवाजी पा . हस्सेकर यांनी केले तर प्रास्ताविक बाबुराव भुते यांनी.

ताज्या बातम्या