उमरी पुरवठा विभागाकडून दंडेल शाहीची गोपनिय वसुली-बाबुराव भुत्ते

तहसीलदारची मुकसमती 
शिवसेनेकडून तक्रार 
( प्रतिनिधी नांदेड जिल्हा-आनंद सुर्यवंशी )

उमरी तालुक्यातील पुरवठा विभागात मनमानी कारभारासह स्वतधान्य दुकानदारावर दंडेलशाही करून हप्ता वसुल करत असल्याची तक्रार शिवसेनेचे बाबुराव संभाजी भुत्ते यांनी मा.तहसीलदार उमरी यांचेमार्फत , आमदार,खासदार या लोकप्रिय नेत्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उमरी तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानदार या अधिकार्‍याला वैतागले असून नाईलाजास्तव सांगलेली रक्कम अदा करावी लागत आहे.

उमरी तालुक्यात एकूण ६५ स्वस्त धान्य दुकानदार असून दर महिन्याला परमिट साठी पाचशे रुपये मोजावे लागते, तर महिण्या अखेर ३२,५०० / . रुपये होतात. तर १२ महिण्याचे ३ लाख ९० हजार रुपये होतात.

दिवाळी म्हणून ही या पुवरठा अधिकारी यांनी प्रती क्वीटंल गाव निहाय २० रुपये लावून जमा केल्याचे म्हटले जाते. या मध्ये तहसीलदार यांचा आशीर्वाद आहे की मुकसंमती हा विचार करणे काळाची गरज आहे.

तहसील मधिल गोपनिय सर्व माहिती नसेल तर तालुक्याचे भ्रष्ट वाटोळे म्हणावे लागेल.मी नाही त्यातली कडी लावा आतली असा प्रकार उमरी तहसील पुरवठा विभागात सुरु असून त्या मध्ये राजकीय अवैध धंदया सोबत असलेले नेते या संबंधीत घोळात असल्याने उमरी तालुक्यात पुरवठा विभागाचा गोपनिय वसुली उघडकीस आली आहे.

तक्रार करणारे शिवसेनेचे बाबूराव भुत्ते यांनी तक्रार करून उमरी तहसील पुरवठा विभागाचा पडदाफाश केला आहे.
नांदेड जिल्ह्यात उमरी पुरवठा विभागात भष्ट्राचार किती आहे? याचा विचार करणे व सांगणे कटीण आहे.

 

निवेदनात बाबुराव भुत्ते म्हणाले की, दर महीन्याप्रमाणे वसुली झाली व दिपावलीची ही एकूण वसुली झाली तर २० रु. क्वीटल प्रमाणे नोव्हेबंर अखेर ४५४२.१७ कवीटंल धान्य वाटप प्रमाणे २०रु क्वीटंल प्रमाणे ९०,८४३४ रुपये पुरवठा विभागाने जमा केल्याची तक्रार आमदार राजेश पवार,खासदार प्रताप पाटील चिखलीकर , हिगोंली खासदार हेमंत पाटील यांच्याकडे केली आहे.

स्वस्त धान्य दुकानदाराचे ऑनलाईन वाटप सुरु असले तरी शेवटी ऑनलाईन हे नामपात्र असल्याचे बाबुराव भुत्ते यांनी तक्रारीत सांगितले आहे.

ताज्या बातम्या