मनुर येथे सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव तालुक्यातील मनुर (त.ब ) येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त मनुर (त.ब ) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर सकाळी ९ वाजता छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज सुधाकर पाटील शिंदे जयंती मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते फडकविण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री प्रल्हाद पाटील शिंदे माजी सरपंच व नामदेव पाटील शिंदे सरपंच प्रतिनिधी गुणाजी पाटील शिंदे बालाजी पाटील शिंदे उपसरपंच विक्रम पाटील बामणीकर शिवसेना उपशहर प्रमुख नांदेड दक्षिण बाळासाहेब पाटील सर्जे युवा सेना विधानसभा समन्वयक व ग्रामपंचायत सदस्य मनुर गोविंद गुरुजी शिंदे नारायण पाटील शिंदे महादेव शिंदे शिवदास पाटील शिंदे आनंदा पाटील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
 त्यानंतर दुपारी तीन वाजता जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तोलचित्राची गावातील हनुमान मंदिर मार्गे बस स्टॉप पासून मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली. व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी मिरवणुकीचे सायंकाळी सहा वाजता सांगता करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी शिवजयंती मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. शिवजन्म यशस्वी करण्यासाठी शिवाजी शिंदे प्रकाश सर्जे योगेश शिंदे गणेश शिंदे गोपाळ सर्जे चंद्र पाटील शिंदे तिरुपती शिंदे उत्तम पाटील शिंदे बाबू पाटील माजी सरपंच हनुमंत पाटील शिंदे आनंदा किनाळकर माणिक पाटील सर्जे विठ्ठल पाटील सर्जे अशोक पाटील सर्जे अवधूत सर्जे राम सर्जे गुंडा सर्जे संजय पाटील शिंदे सचिन शिंदे किशन पाटील शिंदे पंडित पाटील शिंदे सदा पाटील शिंदे वैजनाथ पांचाळ गोविंद सर्जे पुंडलिक पाटील सर्जे गणेश पाटील शिंदे या शिवभक्ताने शिवजन्मोत्सवात भाग घेऊन मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक शिवजयंती मनुर येथे मोठ्या उत्साहात व शिव भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शिवजन्म उत्सव बंदोबस्तासाठी श्री कंधारे साहेब यांची उपस्थिती होती व शिवजन्मोत्सव मिरवणुकीमध्ये गावांतील प्रतिष्ठित नागरिक व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या