शिवमनगर येथे शिवजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
शिवम नगर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवजन्मोत्सव युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला. शिवमनगर बेळगे नगर ज्ञानेश्वर नगर मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक नायगाव विधानसभेचे युवा नेते प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे सर उपनगराध्यक्ष प्रतिनिधी विराज पाटील चव्हाण नगराध्यक्ष प्रतिनिधी गजानन पाटील कल्याण हे होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वल, जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली. या कार्यक्रमात युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण म्हणाले की जिजाऊनी शिवरायना रयतेच राज्यस्थापन करण्यासाठी अठरापगड जातींना घेऊन महिलांचा सन्मान केला पाहिजे असे शिक्षण दिले होते.

म्हणून प्रत्येकाने शिवाजी राजांचा आदर्श घेऊन वागल्यास खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचे फळ मिळेल असे प्राचार्य रवींद्र चव्हाण म्हणाले तर चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपली मनोगते व्यक्त केली व शिवव्याख्याते प्राध्यापक मानसिंग ताटे सर यांनी आपल्या व्याख्यानातून शिव गजर करून छत्रपती शिवरायांचे विचार आपण आपल्या अंगी रुजून एक समृद्ध राष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून सांगितले.
या कार्यक्रमात ग्रामीण कवी बालाजी पेटेकर सर व व्यंकट आनेराये सर यांनी आपल्या हास्य कवितेतून तंत्रज्ञानाचे फायदे व दुष्परिणाम यांच्यावर प्रकाश टाकला व तसेच बालाजी पवार सर यांनी पोवाडे गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला नगरपंचायत गटनेते सुधाकर पाटील शिंदे नगरसेविका प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी नारायण पाटील जाधव माजी नगराध्यक्ष पांडुरंग पाटील चव्हाण नगरसेवक हनुमंत बोईनवाड माणिक पाटील चव्हाण फुलाजी पाटील हरेगावकर व तिन्ही नगरातील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ व बाल मंडळ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी एम शिंदे सर, व्ही सी जाधव सर, डी टी जाधव सर, पत्रकार गजानन चौधरी, भास्कर पाटील शिंदे, बी डी शिंदे, भगवान पाटील मनुरकर, संजय पाटील शिंदे, रावसाहेब पाटील सावळे, माजी सैनिक संजय पाटील तोडे, सुभाष पाटील मोरे, संभाजी पाटील कदम, नरवाडे साहेब, संजय पाटील पांढरे, हिवराळे सर, गजानन पाटील मनुरकर, कोंडेवाड साहेब, नोरलावार साहेब, बालाजी पाटील, आर आर शिंदे सर, सकनूरे सर, चव्हाण सर, ताटे पाटील, मारुती पाटील , रोडेवाड सर, बेंद्रीकर महाराज, परमेश्वर बेंद्रीकर, कुटे साहेब, दीपक शिंदे, ताटे साहेब, कदम सर, पवार सर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव डी टी यांनी केले. तर सूत्रसंचालन हाणमंत पाटील कुदळेकर व इयत्ता नववीची विद्यार्थिनी समृद्धी शिंदे यांनी केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या