कावलगुडा (बु.) ग्रामपंचायत मध्ये व राजे संभाजी चौकात शिवजयंती उत्साहात साजरी !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
कावलगुडा (बु.) ता.उमरी येथील ग्रामपंचायतीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. ब्रह्मनंद पाटील भुते यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच सौ.ब्रह्मनंदा पाटील भुते, उपसरपंच शेषराव रोडेकर, ग्रा.प.सदस्य माधव मेतकूलवार, केवळाबाई रोडेकर, बाबुराव पाटील भूते, मारोतराव शेवाळे, शहाजी जाधव, ग्रामसेविका यु.डी.मुपडे पांडुरंग रोडेकर, मारुती पाटील भुते आदी उपस्थित होते.

सरपंच सौ. ब्रह्मनंदा पाटील भुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संभाजी चौकात छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण छावाचे शहाजी पाटील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी रामराव पाटील ताटे, बाळासाहेब माली पाटील, बाबुराव पाटील भूते, आनंदा ताटे, कृष्णा पाटील, मारुती पाटील शेवाळे, प्रल्हाद पाटील दुगाडे, ग्रामसेविका यु.डी.मुपडे, माधव मैतूकलवार, प्रकाश पाटील ताटे आदीसह असंख्य हिंदू प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. “जय भवानी,जय शिवाजी” अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. यामुळे येथील परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या