शिवजयंती निमित्त कुंडलवाडीत विविध कार्यक्रमाचे आयोजन 

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
      येथील शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने श्री शिव संस्कार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे,या महोत्सवाच्या माध्यमातून दिनांक 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक 17 रोजी सायंकाळी 4 वाजता शिवचरित्रावर आधारित पथनाट्य स्पर्धा, दिनांक 18 रोजी सकाळी 10 वाजता शिवचरित्रावर आधारित भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा, दिनांक १९ रोजी शिवप्रतिमेचे पूजन व शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात उपक्रम, दिनांक 20 रोजी सायंकाळी 6 वाजता शिवव्याख्यान ‘मला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज ‘ या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.सतीश कांबळे बारामतीकर यांचे व्याख्यान व दिनांक 21 रोजी सायंकाळी 4 वाजता शहरातून भव्य मिरवणूक आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
       वरील सर्व कार्यक्रम कुंडलेश्वर मंदिरा समोर संपन्न होणार आहेत त्यामुळे शहर व परिसरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या