परत्म्याच्या आत्म्याशी जवळ करणारी कथा म्हणजे शिवमहापुराण कथाकार केरूरकर.

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील सातेगाव येथील श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या त्रिवेणी संगमवर गोदावरीच्या काठी रामेश्वराच्या जवळ असलेल्या पुरातन कालीन भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणारे हेमाडपंथी त्रिकूटेश्वर महादेव मंदिरात महाशिवपुराण कथा महाशिव परम कथाकार ह भ प परमपूज्य नरसिंग महाराज केरुरकर यांच्या संगीतमय वातावरणात सुश्राव्य वाणीतून मंत्रमुग्ध करणारी कथा ऐकण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सातेगाव येथील त्रिकुटेश्वर हेमाडपंथी महादेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिना सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व महाशिव कथा सोहळ्याच्या आयोजन या निमित्ताने दिनांक 2 मार्च रोजी 9 मार्च 2024 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात महाशिवरात्रीच्या दिवशी प्रथम कलश वर्धापन दिना निमित्ताने त्रिवेणी संगम गोदावरीचे पाणी आणण्यात आले तरी कोटेश्वर महादेवाला महा अभिषेक पूजा करण्यात आले व महाशिवरात्रीच्या सायंकाळी गावातून भव्य दिव्य मिरवणूक करण्यात आली पहाटे 4 ते 6काकडा भजन, सकाळी 6 ते10 ज्ञानेश्वरी पारायण, 11ते 12 गाथा भजन, 2 ते 5 शिव महापुराण कथा, 5 ते 7 हरिपाठ व रात्री 9 रात्री11 हरिकीर्तन या कीर्तनात प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी दीदी अनुप वाडेकर भगवताचार्य ह भ प परमेश्वर महाराज शहापूरकर विनोदाचार्य, ह भ प गंगाधर महाराज खैरे रेगाव, ह भ प कृष्णा महाराज राजूरकर, ह भ प गंगाधर महाराज दरेगावकर, ह भ प प्रभाकर महाराज पुयड भागवताचार्य व कीर्तनकार ,ह भ प भगवताचार्य प्रकाश महाराज साखरे बाबुळगावकर, तर काल्याचे किर्तन ह भ प संतोष महाराज कुशावाडीकर भगवताचार्य यांच्या वाणीतून टाळ मृदंगाच्या तालावर भजनी मंडळाच्या उपस्थितीत मंत्रमुग्ध करीत कीर्तन भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या