श्री.श्री.प.पु सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती (लघु आळंदी) आयोजित श्री क्षेत्र काशी येथे श्री शिवपुराण कथेची भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात..

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आळंदी देवाची प्रतिरूप समजले जाणारे लघु आळंदी येवती सर्व धर्म समभाव असलेल्या प पू सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थांच्या वतीने श्रीक्षेत्र काशी येथे शिवपुराण कथेची सुरुवात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवाची आळंदी प्रतिरूप समजले जाणाऱ्या लघु आळंदी येवती येथील सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या येवती श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान आयोजित श्री क्षेत्र काशी येथे शिवपुराण कथेची भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात झाली आहे.

या पुराण कथेला महाराष्ट्रातून व आंध्रातून भाविक कथेचे श्रवण करण्यासाठी श्री काशी येथे मठाधिपती श्री सद्गुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रुद्र, बिलवार्चना, सामूहिक जप, काकडा, हरिपाठ अशा भव्य स्वरूपात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमा भव्य दिव्य स्वरूपात 22 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे.
कार्यक्रमास उपस्थित माजी आमदार देगलूर विधानसभा मतदारसंघ सुभाष साबणे, उपनगराध्यक्ष नायगाव विजय पा.चव्हाण नायगाव, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड नांदेड, प्रकाश पा. बेंबरेकर , नंदकुमार चौधरी, माधव शेठ बिज्जमवार इत्यादींची आरतीसाठी उपस्थिती होती. भव्य स्वरूपात कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. 
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या