शे.का.पक्षाने केलेल्या बदनामीला अलिबागमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्याचे सडेतोड उत्तर !

ॲड.मनोज पाटील युवासेना तालुका समन्वयक अलिबाग यांची प्रतिक्रिया !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
विधानसभा २०१९ मधील निवडणुकीत अलिबाग-मुरुडच्या जनतेने नेतृत्त्व नाकारल्यामुळे झालेला दारूण पराभव जिव्हारी लागल्यामुळे आणि आगामी काळातील जिल्हा परिषद निवडणुकीतील होणारा पराभव समोर दिसत असल्यामुळे अलिबाग येथील शेकापक्षातील काही महाभाग मंडळींनी आता शिवसेनेचे आमदार आणि त्यातील प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्त्यांची नाहक बदनामी तसेच अपप्रचार करायला सुरुवात केली आहे. शेकापक्षाच्या “कृषिवल” या मुखपत्रातून अलिबाग-मुरुड तालुक्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार तथा जिल्हाप्रमुख कार्यसम्राट श्री. महेंद्र हरी दळवी तसेच तालुकाप्रमुख श्री. राजाभाई केणी यांची जनतेमध्ये असलेली स्वच्छ प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा घाट शेकापक्षाच्या काही मुजोर लोकांनी घातला असून अलिबाग-मुरुडकरांच्या मनात शेकापक्षाबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
“शिवसेना आमदार साहेबांकडून शिव्यांची लाखोली वाहिली जाते” असे खोटे विधान नुकत्याच शेकापक्षाच्या मुखपत्रातून करण्यात आले. त्याच विधानाला शिवसेनेचे कुर्डुस मतदारसंघातील निष्ठावान कार्यकर्ते आणि तालुकाप्रमुख श्री. राजाभाई केणी यांनी शेकापक्षाला त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर दिले आहे. “खरे पहाता वस्तुस्थिती अशी आहे की याआधी रायगडात शेपक्षाची सत्ता असताना जनतेला कधीच न्याय मिळाला नाही.
जेव्हा कधी सामान्य जनता आपल्या समस्या घेऊन शेकापक्ष आमदारांच्या बंगल्यावर गेली असता अनेकदा लोकांनाच गलिच्छ भाषेत शिव्यांची लाखोली वाहिली जायची. ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना कायमच अपमानास्पद वागणूक शेकापक्षाच्या नेते मंडळींकडून आजवर देण्यात आली. याचे परिणाम मागील विधानसभा निवडणुकीत आपल्या सर्वांनाच पहायला मिळाले. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आता शेकापक्षाकडून शिवसेनेची नाहक बदनामी करण्याचा डाव सुरू आहे.
याउलट शिवसेना आमदार श्री. महेंद्र दळवी यांच्या बंगल्यावरील जनता दरबारात लोकांची रोज हजारो संख्येने होणारी उपस्थिती आणि शेकापक्षाकडून शिवसेनेत होणारा पक्षप्रवेश पहाता शेकापक्षाच्या नेते मंडळींना धडकी भरली आहे. वास्तविक पाहता आमच्या संघटनेत कोणताही प्रकारचे मतभेद नसून आमची एकजूट ही एखाद्या पोलादाप्रमाणे भक्कम आहे. त्याचबरोबर आमदार साहेबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या कार्यप्रणालीवर जनता बेहद्द खुश आहे.
जिल्हा परिषदेतील एक-एक मतदारसंघ शेकापक्षाच्या हातून निसटून चालल्यामुळे कृषिवल या त्यांच्या मुखपत्रातून खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष सातत्याने करत आहे. परंतु आम्ही देखील त्यांचा डाव उधळून लावल्याशिवाय शांत बसणार नाही. येणार्या निवडणुकीत आता जनताच त्यांना त्यांची खरी जागा दाखवेल!“ अशी प्रतिक्रीया ॲड.मनोज पाटील यानी दिली आहे.
 www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या