बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पिक विम्याची भरपाई तात्काळ द्या शिवसेनेचे तहसीलदार यांना निवेदन देवुन मागणी

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
बिलोली तालुक्यातील खरिप हंगामातील अतिवृष्टीच्या पावसामुळे पिकाची नासाडी व दुबार पेरणीचे संकट आले असुन त्यांना मागील दृष्काळी मदत पिकविमा तसेच नंतर झालेली (जुन-जुलै 2023) अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आज पर्यंत मिळालेली नाही. ती नुकसान भरपाई व विमा तात्काळ वाटप करण्यात यावी. नोव्हेबर महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.
त्यांची त्वरीत सरसकट पंचनामा करुन दुबार पेरणीसाठी शासनाकडून आर्थीक मदत मिळवुन दयावी. अन्यथा शेतकऱ्यांना मदत नाही मिळाल्यास शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) बिलोली तालुक्याच्या वतीने अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
 यावेळी जिल्हा उपप्रमुख महेश पाटील युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी पाटील, जिल्हा संघटक विजय मुंडकर विधानसभा प्रमुख सुनिल अॅबडवार, शिवकुमार बाबणे, शिवा पटने, व्यंकट गुजरवाड, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या