शासकीय विश्रामगृह बिलोली येथे शिवसेनेच्या सदस्यांची नोंदणी व आढावा बैठक संपन्न !

शिवसेनेच्या ५० हजार सदस्यांची नोंदणी होणार – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे 
[ बिलोली प्र – सुनिल जेठे ]

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे सदस्य नोंदणीला सुरुवात केली त्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह बिलोली येथे दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी सदस्य नोंदणी व आढावा बैठकीचे आयोजन केलेल्या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सदस्य नोंदणी करून मान्यवरांच्या हस्ते सर्कल प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
सदरील का‌र्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या मार्गदर्शनात म्हणाले की आगामी काळात जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर परिषदेच्या निवडणुका लागणार असल्याने देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघात ५० हजार युवासेना,शिवसेना च्या सदस्य नोंदणी करण्यासाठी टार्गेट सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे,
चार सर्कलमध्ये पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन सदस्य दोन हजार करायचे आहे तर आठवते दहा हजार ऑफलाइन सदस्य नोंदणीचे फार्म भरून घेतले जातील आणि पंचवीस ते तिस हजार ऑनलाइन सदस्य नोंदणी करावी असे सुचना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं गेलेलं टार्गेट हे १५ दिवसांच्या आत पूर्ण करण्यासाठी जबाबदारी पदाधिकाऱ्यांची आहे असे उमेश मुंडे यांनी आपल्या मनोगतून पदाधिकाऱ्यांना सांगितले.
तर शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे यांच्या मनोगतात बिलोली तालुक्यामधील पदाधिकाऱ्यांकडून जास्ती जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करून घेणार आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला बळ देऊन मोठ्या ताकतीने निवडणूका लढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आढावा बैठकीत रोकडे यांनी म्हणाले.
या बैठकीसाठी जिल्हाप्रमुख उमेश मुंडे युवा सेना जिल्हाप्रमुख ओमप्रकाश धुपेकर, युवासेना विधानसभा प्रमुख श्रीराम जाधव दुगावकर,युवा सेना तालुकाप्रमुख अंकुश हिवराळे, शिवसेना तालुका शहरप्रमुख श्रीकांत गादगे, शिवसेना शहरप्रमुख कुंडलवाडी लक्ष्मण गंगोणे, तालुका संघटक रमेश पवनकर, युवा सेना शहर प्रमुख बिलोली रमेश सुरगलोड,युवासेना शहरप्रमुख कुंडलवाडी गंगाधर शिंदे, युवा सेना तालुका समन्वयक सचिन हिवराळे,  उज्वल चेटे यांच्यासह पत्रकार सय्यद रियाज, सुनिल जेठे ही उपस्थित होते.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या