शिवसेनेच्या मागासवर्गीय सेल बिलोली उप तालुका प्रमुखपदी राजकुमार वाघमारे यांची निवड !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या मागासवर्गीय विभागाच्या बिलोली तालुका उप प्रमुखपदी कुंडलवाडी येथील युवा कार्यकर्ते राजकुमार विठ्ठलराव वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मागासवर्गीय विभागाचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांनी राजकुमार वाघमारे यांनी नियुक्ती झाल्याचे पत्र नुकतेच दिले आहे.
राजकुमार वाघमारे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कोविड काळात रुग्णांना मदत करणे, रुग्णालयास पीपीई कीट वाटप करणे आदी उपक्रम राबवले. त्याबद्दल राजकुमार वाघमारे यांना कोविड योद्धा पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्यांची शिवसेनेच्या मागासवर्गीय विभागाच्या बिलोली तालुका उपप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विभागाचे प्रमुख समन्वय राम पांडागळे, खासदार हेमंत पाटील, संपर्कप्रमुख आनंद जाधव, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, मंगेश कदम, कुंडलवाडी शहर प्रमुख लक्ष्मण गंगाने, व्यंकट श्रीरामे, सुरेश राजडवार, पप्पू शिंदे, शेखर भोरे, शेख इशू भैया,सुनील कोटलावार, अजय वाघमारे, प्रणित वाघमारे, मारुती हातोडे, गौतम वाघमारे, रोहित वाघमारे, राजरतन कांबळे यांच्यासह आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या