ग्रामीण रुग्णालयातील दांडी बहादरांना कारणे दाखवा नोटीस !

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी दखल घेतली असून. मुख्यालयी न राहणाऱ्या ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मुख्यालयी न राहील्यास शिस्त भंगाची कारवाई करण्याचा तर इशारा दिलाच असून. एक महिण्यात केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्यात यावा अन्यथा वेतन अदा न करण्याचीही तंबी दिली आहे. 
    सर्व सोई आणि सुविधा असलेले नायगावचे ग्रामीण रुग्णालय आहे परंतु वैद्यकीय अधिकाऱ्याविना रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती. वैद्यकीय अधिक्षकासह ७ वैद्यकीय अधिकारी असतांना नियमितपणे कुणीच सेवा देत नाहीत.
आठ दिवसातून एकदा सेवा देतात आणि गायब होतात. याबाबत दैनिक देशोन्नती 17 मे रोजी प्रकाशित झालेल्या बातमीचा इफेक्ट झाल्याने म्हणजे रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आठ दिवसातून एक दिवस देतात भेट अशी बातमी प्रकाशित करुन कोलमडलेल्या वैद्यकीय सेवेचा पंचनामा केला होता. या बातमीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची वरिष्ठांनी झाडाझडती घेतली व अधिक्षकांना कानपिचक्या दिल्यानंतर वैद्यकीय अधिक्षक सोनकांबळे यांना जाग आली. 
      ग्रामीण रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. एस.ई. पठाण, भुलतज्ञ डॉ. व्ही.पी. कोंपलवाड, नेत्र तज्ञ डॉ. के.ए.नाईक, अस्थिरोग तज्ञ डॉ. वाय. एन. अडबलवार, कान नाक घसा तज्ञ डॉ. एस.जी. जाधव, स्त्री रोग तज्ञ डॉ.एम.एम.टोंपे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सरजी. जाधव अदिंना (ता.२९) रोजी दोन वेगवेगळ्या नोटिसा बजावल्या आहेत. पहील्या नोटीसीत आपण आठवड्यातून एकदाच उपस्थित राहता अशी बातमी प्रसार माध्यमाद्वारे प्रकाशित झाली असून ही खेदाची बाब आहे. यापुढे आपण नियमित उपस्थित राहून ओ पी डी व आय पी डी आणि अत्यावश्यक रुग्नांना सेवा देणे बंधनकारक आहे. तसेच आपण १ मे ते २८ मे पर्यंत केलेल्या दैनंदिन कामाचा माझ्या समक्ष लेखी अहवाल सादर करण्यात यावा अन्यथा आपल्या विरुद्ध कारवाई प्रस्तावित तर करण्यात येईलच परंतु आपले मे महिण्याचे वेतन अदा करण्यात येणार नाही असा इशारा दिला आहे. या नोटीसीची प्रत लेखा विभागाला देवून मे महिण्याचे वेतन अदा न करण्यासाठी कळविले आहे. 
     दुसऱ्या नोटीसीत ग्रामीण रुग्णालय नायगाव/ट्रामा केअर यूनिट नायगाव येथील अत्यावश्यक सेवेतील कार्यरत वैद्‌कीय अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्य करुन राहण्या बाबत आपणास वरिष्ठ कार्यलयाकडून वारंवार लेखी व तोंडी सुचना देऊन सुद्धा आपण मुख्यालयी वास्तव्यास राहत नाही ही अत्यंत खेद जनक बाब आहे. त्यामुळे वर्तमान पत्रामध्ये वारंवार बातम्या प्रसिद्ध होत आहे. असे निदर्शनास आले आहे की आपण मुख्यालयी वास्तव्य करून राहत नसल्यामुळे रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे सदर बाब रुग्णालयीन सेवेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे तसेच लोकप्रतिनिधीद्वारे वारंवार ह्या बाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जनमानसात आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन होत आहे यावरून आपणास रुग्नालयीन शिस्तीचा भंग केल्याचे व् कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे. त्या अनुशंगाने आपणास सदर कारणे दाखवा नोटिसद्वारे विचारणा करण्यात येते की आपण मुख्यालयी वास्तव्य करून रहावे त्याची आपण नोंद घ्यावी अन्यथा आपल्या विरुद्ध म.ना.से. (शिस्त व् अपील) नियम १९७९ मधील ८ अन्वये शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल अशी तंबी दिली आहे. 
      अनेक वेळा नोटीस दंडात्मक कारवाई करण्यात आल्यानंतरही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनात काहीही फरक पडला नाही. या नोटीसीची किती गांभीर्याने दखल घेतात हे येणाऱ्या काळात दिसेल.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या