श्रामणेर सदानंद देवके यांचा सत्कार !

(धर्माबाद प्रतिनिधी-नारायण सोनटक्के)

भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सदानंद विठ्ठलराव   देवके रोशनगावकर हे नांदेड सिडको येथे  १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२१ कालावधीत झालेल्याश्रामनेर शिबिरात  प्रशिक्षण  घेतल्याबद्दल  हर्ष नगर येथील लुम्बिनी बुद्ध विहार  येथे त्यांचा शाल, पुष्पहार देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.

  श्रामणेर सदानंद देवके हे  दहा दिवसाच्या श्रामनेर शिबिरात  मुंबई चैत्यभूमी दादर येथील पू.भंन्ते दिपंकरजी थेरो, तपोवन बुद्धभूमी गोळेगाव ता.लोहा येथील पूज्य भंते बोधीधम्मो,  केंद्रीय शिक्षक संबोधी सोनकांबळे, बि.डी.कांबळे, नरसिंग दरबारे, अमृत गवलवाड, युवराज मोरे, रेखाताई पंडित,सूभाष डोंगरे व जिल्हा अध्यक्ष पी.एम. वाघमारे यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी आचार आणि विचार समाजात पेरण्याचे काम करीन  तसेच शाखा स्थापन करीन असे आश्वासन दिले.

 या प्रसंगी  लुम्बिनी बुद्धविहारात बौद्ध महासभेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष जी.पी. मिसाळे व आयु.नी भारतबाई यांनी श्रामणेर सदानंद देवके व आयु.नि. सुनिता शाल, पुष्पहार व बौद्ध पूजा पाठाचे पुस्तक देऊन  सत्कार केला.

 याप्रसंगी चैतन्य घाटे, रामराव सोनटक्के, साहेबराव शिरसे, ज्योती घाटे, आरती सोनटक्के, किशनराव सोनकांबळे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या