प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात अनेकांनी सहभागी होऊन दिले दिले योगदान

धर्म किंवा आपल्यातील आपली आस्था राखून ठेवण्यासाठी आपण त्या नियमाचे पालन करून चालणे गरजेचे आहे.  परंतु काही कर्मठ लोकांनी या भव्य रॅली मध्ये व्यत्यय आणल्यामुळे पोलिसांचा प्रसाद त्यांना मिळाला आहे.ती बाब वेगळी ठरते.

[ नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शहरातील राजुरा हनुमान मंदिरापासून निघालेल्या प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यातील भव्य शोभायात्रेत अनेक दैवदैवतांची हुबेहूब देखाव्यांनी डोळ्याचे पारणे फेडले. या शोभायात्रेत युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यासह श्रीनिवास पाटील चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर यांनीही सहभाग नोंदविला. तर हजारोच्या संख्येने जमलेल्या भक्तासाठी भाजपा शहराध्यक्षा सौ पल्लवी बळीराम पाटील वडजे यांच्याकडून खिचडी व पाणी वाटप करण्यात आली.

      श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कैलास पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रेचे आयोजन दिनांक 26 मे रविवार रोजी करण्यात आले होते, शहरातील राजुरा हनुमान मंदिरापासून निघालेल्या प्रभू श्रीराम भव्य शोभा यात्रेत नंदी, छत्री यासह श्री महादेव श्रीराम श्री हनुमान या देवदैवतांचे हुबेहूब देखावे शहरवासीयांच्या डोळ्याचे पारणे फेडली असून जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देत रामभक्त आणि शहर दणाणून सोडले तर छत्रपती शिवाजी महाराज यासह देश स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव वीर सावरकर यांच्या प्रतिमानी शोभायात्रेत देशभक्तीचे दर्शन घडविले.
नायगाव शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या हजारो भक्तासाठी सौ पल्लवी बळीराम पाटील वडजे व गजानन व्यंकटराव पाटील कल्याण यांच्याकडून खिचडी वाटप करण्यात आली तर सराफा असोसिएशनचे कैलास पाटील कल्याण, राजेश गादेवार, गणेश चव्हाण, गुरुनाथ शिंदे, श्रीनिवास शिंपाळे यांनी सातशे लिटर मठा वाटप करून भक्तांना तृप्त केले आणि श्रद्धा ज्वेलर्सचे दीपक काशिनाथ भोकरे यांच्याकडून सर्वांसाठी थंडगार पाण्याची सोय करण्यात आली होती. नायगाव शहरात सर्वत्र भगवा पताका बॅनरबाजी आणि शोभायात्रेतील भगवे ध्वज व श्रीरामाच्या जयघोष करीत यात्रेचे विसर्जन शहरातील साईबाबा मंदिर येथे करण्यात आले या रॅलीमध्ये युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनीही सहभाग घेऊन दर्शन घेतले तर पोलीस प्रशासनानी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला होते
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या