श्री साईबाबा मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्सव पालखी सोहळा चे आयोजन !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
सर्वधर्म समभावाचे प्रतीक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या नायगाव येथील पानसरे नगरातील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमासह भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
                 नायगाव येथील पानसरे नगरातील श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमासह पालखी सोहळा असून दिनांक 21 जुलै रोजी रविवारी पहाटे 5,25 वाजता श्री चे काकड आरती 6,00 वाजता मंगलस्नान व दर्शन सकाळी 8,30 वाजता महापूजा व दर्शन सकाळी 9,00वाजता श्री च्या पालखीचे भव्य दिव्य शोभायात्रा दुपारी 12,30 वाजता श्रीची महाआरती आरती 1,00 वाजता महाप्रसाद तीर्थप्रसाद सायंकाळी 6,00 वाजता धुपारती व 9,00 वाजता शेजारती आदी कार्यक्रमाचे आयोजन असून पालखी सोहळा निमित्ताने सकाळी 9,00 ते 11,00 वाजेपर्यंत भव्य दिव्य पालखी सोहळा मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावर भरून ढोल ताशाच्या गजरात निघणार असून या कार्यक्रमासाठी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या