आर्य वैश्य महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उदयोगपती श्री.नंदकुमार गादेवार यांची नुकतीच पेनिगुंडा येथील मूळ अ.भा. श्री वासवी पेनिगुंडा ट्रस्ट च्या विश्वस्थ पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
आर्य वैश्य समाजभुषण फेडरेशन ऑफ ऑल इंडिया आर्य वैश्य महासभाचे संस्थापक अध्यक्ष,श्री काशी अन्नपूर्णा आर्य वैश्य वृद्धाश्रम आणि नित्यान्नसत्रमचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष,महाराष्ट्र आर्य वैश्य महासभाचे अध्यक्ष, श्री संत साधु महाराज संस्थानचे उपाध्यक्ष मा.श्री नंदकुमारजी गादेवार यांची श्री रामनवमीच्या मुहूर्तावर आर्य वैश्य समाज बांधवांची कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी मातेचे जन्मस्थान असलेल्या पेनुगोंडा येथील अखिल भारतीय वासवीमाता ट्रस्टच्या विश्वस्थ म्हणून प्रथम महाराष्ट्र राज्यातून बिनविरोध निवड झाली असुन मा.नंदकुमाजी गादेवार हे महाराष्ट्रातील आपल्या समाज बांधवापैकी नियुक्त झालेले पहिले सदस्य होण्याचा बहुमान त्यांना लाभला आहे.
आपली नियुक्ती समस्त आर्य वैश्य समाज बांधवांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद अशी आहे. आपल्या गरुडभरारी बद्दल सर्वत्र त्यांचे खुप अभिनंदन होत आहे. राज्यतीलच नव्हे तर भारत देशात समाज संघटन मजबूत करण्यासाठी मोठं योगदान आहे.
तिरुपती येथे महासभेचे भक्त निवास ,लातूर येथे मंगल कार्यालय, समाजातील गरजवन्ताचा स्तर उंचावणे, समाजावर होणारे अन्याय अत्याचार यावर मजबुतीने पाठीशी उभे राहणे असे कार्य गादेवार यांनी केले निवड होतात गोविंदराव बिडवई, भानुदास वट्टमवार, ज्ञानेश्वर महाजन . सूर्यकांत शिरपेवार, सदानंद मेडेवार, अनिल मनाठकर. दिलीप कंदकुर्ते, नंदकुमार मडगुलवार. राम पत्तेवार,प्रदीप जी कोकडवार, सुधीर पाटील, विजय कुंचनवार, रमाकांत रायेवार,गजानन चौधरी, साईनाथ मेडेवार, पवन गादेवार, सतीश मेडेवार, सूर्यकांत कवटीकवार, यासह महासभेचे सर्व पदाधिकारी प्रकाश यांना पूर्ण सर्व सदस्य यांनी स्वागत केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy