के. रामलू शाळेच्या वारकरी दिंडीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 येथील के. रामलू पब्लिक स्कूलने जन्माष्टमी निमित्त काढलेल्या शोभा यात्रेने संपूर्ण कुंडलवाडी शहर कृष्णमय झाले आहे.
या वारकरी दिंडीचे उद्घाटक कुंडलवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, श्री ज्ञानेश्वर ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी विनोद माहुरे, कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांच्या हस्ते पालखीचे पूजन व उद्घाटन करण्यात आले.
कुंडलेश्वर मंदिरापासून पालखीला सुरुवात करून शाळेपर्यंत निघालेल्या वारकरी दिंडीत शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून अनेक जणांनी राधाकृष्ण, गवळण, संत, देवी देवता व वारकरी यांच्या वेशभूषेने भारतीय संस्कृतीचे जपवणूक करण्याची शिकवण दिली.
या शोभायात्रेचा शेवट शाळेत नववी व दहावीच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून केली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे संस्था अध्यक्ष सायरेडडी ठक्कूरवार,सचिव यशवंत संगमवार, संचालिका सौ.रमा ठक्कूरवार, मु.अ. मठवाले पी.एच, श्री.ईश्वर झंपलकर, पर्यवेक्षक श्री. राजेश कागळे व सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या