भारतीय सैनिक आपला प्राण तळहातावर घेऊन देशाच्या नागरिकांचं संरक्षण करीत असतात, आपले बावीस वर्ष खडतर सेवा कार्य प्रवास पूर्ण करून सैनिक सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांना खाजगी नोकरी पेक्षा शासकीय सेवेत सामावून घेणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रखड मत प्रा. रविंद्र पाटील चव्हाण यांनी आयोजित जयंती व गौरव सोहळा कार्यक्रमात व्यक्त केले.
तालुक्यातील बरबडा येथील सी आर पी एफ चे जवान बालाजी माधवराव सूर्यतळ यांचा 22 वर्षांचा कार्यकाल संपून सेवानिवृत्त झाल्याने सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती व गौरव सोहळा आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी युवा नेते प्रा. रविंद्र पाटील चव्हाण तर उद्घाटक डॉ. मुकुंदराव पाटील बेलकर, प्रमुख वक्ते प्रा डॉ. शंकर गड्डमवार, स्वागताधक्ष बालाजीराव मद्देवाड, प्रा.वा. ल श्रीमंगले, रा.ना. मेटकर, संजय बालाजीराव चोंडे, प्रथम नगराध्यक्ष प्रतिनिधी पंढरी भालेराव, नगरसेवक शरद भालेराव, दयानंद भालेराव आणि शाहीर के.डी. पाटील बेंबरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
प्रारंभी वीर जवान बालाजी सूर्यतळ यांची नायगाव शहरातून भव्य अशी मिरवणूक भारत माता की जय अशा प्रचंड घोषणा देत फटाक्याची आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करीत कार्यक्रम स्थळी आल्यानंतर उपस्थित मान्यवराकडून भव्य असे स्वागत व सन्मान वीर जवान बालाजी सूर्यतळ यांचा करण्यात आला.
प्रा. रविंद्र चव्हाण आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की सैनिकांची सेवा अतिशय पवित्र आहे आणि खडतरही आहे ऊन पाऊस थंडी वादळाची टक्कर देत झुंज देणाऱ्या सैनिकामुळेच तुम्ही आम्हीमी समाधानांचे जीवन जगतोय अशा सैनिकांचा जीवन प्रवाह वयोमानानुसार संपल्यानंतर त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. यावेळी निष्ठावंत कार्यकर्ते गणपत रेड्डी, सेवानिवृत्त पीआय शेषराव रोडे, प्रसिद्ध बासरी वादक विजयकुमार द्रोणाचार्य, शंकर गायकवाड, अशोक पाटील बळेगावकर, नामदेव गायकवाड, मारुती कांबळे, नागोराव वाघमारे, सेवानिवृत्त लाईनमन भेदेकर, कार्यक्रमाचे आयोजक जनमित्र विक्रम भालेराव व त्यांचे सहकारी माधव पवार, शिवहार कांबळे, राजु गायकवाड, विनोद तात्या भालेराव, माधव ऐंजपवाड यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार माधव बैलकवाड तर आभार दिगंबर झुंजारे यांनी मानले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy