श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]

नायगाव येथील भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या व्यंकटेश नगरातील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मंदिरात पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात.

  श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने श्री स्वामी समर्थ मंदिरात दिनांक 20 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने दिनांक 19 एप्रिल शनिवार ग्रामदेवता मान सन्मान मंडल मांडनी, नित्य स्वाहाकार, मंडल स्थापन, अग्नी स्थापना, स्थापित देवता हवन, 21 एप्रिल नित्य स्वाहाकार गणेशयाग, मनोबोध याग, 22 एप्रिल नित्य स्वाहाकार चंडी, 23 एप्रिल नित्य सोहळा स्वामी याग, 24 एप्रिल नित्यसूहागार श्री गीताई याग, 25 एप्रिल नित्यसहाकार रुद्र या मल्हारी याग, दिनांक 26 एप्रिल शनिवार रोजी नित्यसहाकार बली पूर्णाहुती सत्यदत्त पूजन व सप्ताह सांगता, रोज सकाळी 6 ते 8 सामूहिक गुरुचरित्र वाचन, औदुंबर प्रदक्षिणा, भूपाळी आरती, विशेष याग यज्ञ, नैवेद्य आरती, मंत्रपुष्पांजली, दुर्गा सप्तशती. स्वामी चरित्र सारामृत, मल्हारी सप्तशती, एक आवर्तन रुद्राध्याय, पुण्यतिथी निमित्ताने पूजा, अर्चा, महाआरती, येथील नगरपंचायत उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनी सहपत्नीक केली.

विजय पाटील चव्हाण परिवाराच्या वतीने मंदिरात आलेल्या सर्व महिलांची ओटी भरण्यात आली. यावेळी नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, पांडू पाटील चव्हाण, नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, प्रल्हाद पाटील कदम, गजानन चौधरी, साईनाथ मेडेवार, दिलीप पाटील चव्हाण, ताटे पाटील, हनमंत पाटील चव्हाण, बंडू गुंडाळे, मुन्ना ठाकूर यांच्यासह नगरसेवक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआरतीनंतर पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने ज्या ज्या भाविकांनी विशेष सेवा केली त्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. पुण्यतिथी निमित्ताने आलेल्या महिला पुरुष बालगोपाळ मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
www.massmaharashtra.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या