श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता जन्मोत्सव थाटात साजरा.

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने वासवी कन्या का परमेश्वरी मातेच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात आर्य वैश्य महासभेचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विजय कुंचनवार, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार,वसंतराव मेडेवार, बाबू सावकार अरगुलवार, चंद्रकांत कवटीकवार, राजेश्वर मेढेवर,सतीश मेडेवार, निवास जवादवार, गजानन चौधरी, आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

तसेच वासवी माता कन्यका परमेश्वरी मातेचे आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सतीश मेडेवार यांनी सह पत्नीक विधिवत पूजन केले पूजनानंतर सामूहिक विष्णुसहस्त्रनामपाठ, कुंकुमार्चना व मातेचे महाआरती करण्यात आली महारथी झाल्यानंतर नंतर नृत्य व संगीत मैफीलचा बहारदार कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमात विविध भक्तीमय गीते सादर करण्यात आली. यावेळी गणेशराव पाळेकर, सूर्यकांत कवटिकवार, सतीश लोकमनवार, कपिलेश्वर नलबलवार, चंद्रकांत बच्चेवार,अतुल कवटिकवार, श्रीनिवास गडपल्लेवार, धनंजय कवटिकवार, साईनाथ मेडेवार, पवन गादेवार, जगदीश प्रतापवार, कैलास कवटिकवार, सचिन चिद्रावार, साईनाथ वट्टमवार, मनोज आरगुलवार, चंद्रकांत कऊलवार, विठ्ठल सा लाभसेटवर, एल टी मामिडवार, रमेश चिद्रावार , जगन्नाथ दाचावार , बालाजी कोटूरवार, गंगामवार, यांच्यासह समाजातील पुरुष, महिला, मुलं-मुली ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या