श्रीनिवास काशेटवार यांचे निधन !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 नायगाव तालुक्यातील कहाळा (बुद्रुक) येथील रहिवाशी श्रीनिवास मुरलीधर काशेटवार (वय 50 वर्ष ) यांचे अपघातात मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिराने नायगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक जावई, दोन मुले, नातू असा परिवार आहे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अपघातात निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या