बेंद्रीचा भूमिपुत्र नागपूरच्या उच्च न्यायालयात कारकून पदावर !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
बेंद्री येथील शेतकरी कुटुंबातील श्रीनिवास प्रकाशराव पाटील बेंद्रीकर या विद्यार्थ्याने नागपूरच्या उच्च न्यायालयात कारकून पदावर निवड झाल्याने श्रीनिवास यांचे गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य विशेष सत्कार खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला नायगाव तालुक्यातील बेंद्री येथील शेतकरी कुटुंबातील होतकरू जिद्दी विद्यार्थी श्रीनिवास प्रकाशराव पाटील बेंद्रीकर याचे शिक्षण नायगाव येथील जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात कला या विषयात विशेष गुण प्राप्त झाल्याने त्याने पुढील शिक्षण नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात घेतले बी ए, एम ए, अर्थशास्त्र या विषयावर विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यामुळे त्यास विविध क्षेत्रातून चार पारितोषक मिळाल्यानंतर त्याने नागपूर येथील उच्च न्यायालयात कारकून पदासाठी परीक्षा दिली.
त्यामध्ये सुद्धा विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यामुळे तो कारकून या पदावर कार्यरत झाला श्रीनिवास बेंद्रीकर यांना कुठल्याही प्रकारचे उच्च नामांकित ट्युशन लावण्यात आले.
नव्हते केवळ तो स्वतःच्या पायावर जिद्द, चिकाटी, मेहनतीने, तो अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात इतिहास घडवून बेंद्रीचे नाव उज्वल केल्याने गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार सोहळ्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आ राम पाटील रातोळीकर, अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर, प्रवीण पाटील चिखलीकर, श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, बालाजी बच्चेवार, माणिकराव लोहगाव, बेंद्री चे सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर, गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या