शुभदा दरबस्तेवारचे जिल्हा स्तरीय आय. एम. ओ.परीक्षेत यश !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
       येथील के. रामलू पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कुमारी शुभदा सुभाष दरबस्तेवार हिने जिल्हास्तरावर संपन्न झालेल्या सेकंड लेवल आय. एम .ओ परीक्षेत यश संपादन करून शाळेतून दुसरा क्रमांक पटकाविलेला आहे. याबाबत माहिती अशी की, डिसेंबर 2023 मध्ये आय. एम. ओ. ची फर्स्ट लेवल परीक्षा संपन्न झाली होती. या फर्स्ट लेवल आय. एम. ओ. परीक्षेत शुभदाने चांगले गुण मिळवून सेकंड लेवल आय .एम. ओ. परीक्षेत पात्र ठरली होती.
सदरील सेकंड लेवलची आय. एम. ओ. परीक्षा नांदेड येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाली. या परीक्षेत शुभदाने राष्ट्रीय स्तरावर 4890 चा रॅन्क तर विभागीय स्तरावर 583 चा रॅन्क मिळवून शाळेतून द्वितीय क्रमांक पटकाविली आहे. तिला या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल गुणवत्ताधारक प्रमाणपत्र मिळणार आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सायरेड्डी ठकूरवार, सचिव यशवंत संगमवार, संचालिका सौ.रमा ठकूरवार , प्राचार्य टी. नरसिंगराव, मुख्याध्यापक पापया आप्पा मठवाले, पर्यवेक्षक राजेश कागळे, वर्ग शिक्षिका सौ संध्या पाठक, गणित विषयाचे मार्गदर्शक दतराम लाड सर,सुनील परसुरे सर, सुशील सर, सौ. पेंडकर मॅडम ,सौ. अर्चना नरोड मॅडम सह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या