महापुरुषांच्या इतिहासातील प्रेरणा घेऊन वर्तमानात संघर्ष करावा लागेल – श्याम खडेलोटे यांचे प्रतिपादन !

कार्यक्रमातील अध्यक्ष नायगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, लोकनेते मा.आ.वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव शहरात लवकरच संत रविदास महाराज सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
   विज्ञानवादी विद्रोही संत रविदास महाराज यांच्या कार्यकाळात जात धर्म व्यवस्था नादत होती ती व्यवस्था मुळासकट नष्ट करण्यासाठी आणि समतेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी संत रविदासानी आयुष्यभर संघर्ष केला आहे या महापुरुषांच्या इतिहासातील प्रेरणा घेऊन आजच्या वर्तमानात संघर्ष युवकांना करावा लागेल असे प्रखड मत विचारवंत श्याम खडेलोटे यांनी आयोजित जयंती महोत्सवात व्यक्त केले.
  नायगाव शहरातील लिटल स्टेप इंग्लिश स्कूल येथे आयोजित गुरु रविदास सार्वजनिक जयंती महोत्सव प्रसंगी अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, संत साहित्याचे गाढे अभ्यासक शाम खडेलोटे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माधव गायकवाड, राज्यसचिव रमेशचंद्र हराळे, रवींद्र भालेराव, डॉ. शिवाजी कागडे, नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण, नारायणराव जाधव, माणिक पाटील चव्हाण, बाळासाहेब पांडे, मधुकर गिरगावकर, व्यंकट कांबळे, विठ्ठल वाघमारे, केरबा गंगासागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेसह सर्व मानवतावादी महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन व अभिवादन केल्यानंतर जयंती मंडळातर्फे सर्व मान्यवरांचा येथोचित सन्मान करण्यात आला असून याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष व आयोजक राजेंद्र कांबळे यांनी प्रस्ताविकातून आपली भूमिका विशद केली.
यावेळी प्राचार्य पंढरी कोतेवार ,राजेंद्र रेड्डी, सचिन दुधंबे, बाबुराव मिनकीकर, रामचंद्र करखेले, बाळू गायकवाड यासह जयंती मंडळ पदाधिकारी संदीप बालकोंडे, नागेश भालके, पांडुरंग हवेली, संतोष हवेलीकर, राजेश वाघमारे, संजय सोनटक्के, मारुती गंगासागरे, संजय कांबळजकर, चंद्रकांत हवेली, माधव सोनटक्के, राजेश हवेलीकर, माधव गंगासागरे, मोहन गंधारे, शिवाजी हवेलीकर, शिवाजी शिराढोणकर, दिगंबर लोंढे, बालाजी गंगासागरे, दिगंबर गंधारे, पांडुरंग हवेलीकर, अजय हवेलीकर, चंद्रकांत हवेलीकर, संतोष सूर्यवंशी, संतोष भालके यासह महिला पुरुष यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या