डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे यांचे विचार आपल्या जीवनात आत्मसात करुन शिक्षण घ्या तरच आपली प्रगती होईल – सिध्दार्थ कांबळे

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी शहरापासून काही अंतरावर असलेल्या मौजे हरनाळी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी सर्वप्रथम लाल ध्वजाचे ध्वजारोहण गावचे सरपंच साहेबराव पाटील शिंदे यांच्या हस्ते सकाळी ठिक १०:३० वाजता करण्यात आले. त्यानंतर उपस्थितीत सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लहान-लहान बालकांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यानंतर विविध मान्यवरांनी पण आपापले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार सिध्दार्थ कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे यांचे विचार आपल्या जीवनात आत्मसात करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. असा मुलमंत्र सर्वांना दिला आहे.म्हणून आपल्या मुलांना शिक्षण शिकवून मोठे अधिकारी बनवा तरच आपली प्रगती होईल अन्यथा शिक्षणा अभावी आपली गुलामीकडे वाटचाल सुरु होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव वाघमारे कांगठीकर, प्रमुख पाहुणे पत्रकार सिध्दार्थ कांबळे, विद्रोही गायक गौतम भालेराव, मा.सरपंच साहेबराव डोंगरे, प्रा.बालाजी शिरगिरे, हेमंत धोत्रे, सुशील भालेराव, निदाने, बिरु महाराज, रूक्माजी होरके, शंकर होरके, भिमराव पा.शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अण्णा भाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष नामदेव शिंदे, उपाध्यक्ष सुशील वाघमारे, सचिव सदानंद शिंदे, सहसचिव हनमंत शिंदे, कोषाध्यक्ष प्रशांत वाळवे, सदस्य विठ्ठल शिंदे, चंद्रप्रकाश शिंदे, सुरेश शिंदे, मारोती शिंदे (ग्रा.प.सदस्य), मारोती शिंदे, चंद्रकांत शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, विठ्ठल शिंदे, चंद्रकांत शिंदे, गंगाराम शिंदे, यशवंत शिंदे आदींनी परिश्रम घेतले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना शिंदे तर आभार चंद्रप्रकाश शिंदे यांनी मांडले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या